शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

 पीक नुकसानाच्या फोटो पंचनाम्यासाठी ‘सीएम वॉर रुम’ कामाला लावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 11:45 IST

पंचनामे करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ‘वॉर रुम’ची यंत्रणा कामाला लावावी, अशी मागणी किशोर तिवारी यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना केली.

- संतोष येलकर

अकोला : राज्यात बरसणाऱ्या अवकाळी पावसाचा कहर सुरूच असून, अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिके उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत तातडीने देण्याकरिता पीक नुकसानाचे २४ तासांत फोटो (छायाचित्र) पंचनामे करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ‘वॉर रुम’ची यंत्रणा कामाला लावावी, अशी मागणी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना केली.पावसाळा संपल्यानंतर गत महिनाभरापासून अवकाळी पाऊस सुरू आहे. अवकाळी पावसाचा कहर सुरूच असल्याने, विदर्भ -मराठवाड्यासह राज्यभरात ८० लाख हेक्टरवरील ३० हजार कोटी रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाचा सुरू असलेला कहर आणि पिकांचे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेता, पीक नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी कृषी आणि महसूल यंत्रणा हतबल ठरत असल्याने, पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यासाठी विलंब लागणार आहे. त्यामुळे पीक नुकसानामुळे संकटात सापडलेल्या शेतकºयांना तातडीने पीक नुकसान भरपाईची मदत देण्याकरिता, शासनाने पीक नुकसानाचे २४ तासांत फोटो (छायाचित्र) पंचनामे करण्याचे आदेश देऊन, या कामासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ‘वॉर रुम’मधील यंत्रणेला कामाला लावावे, अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे.निवडून देणारा शेतकरी अडचणीत; यंत्रणेचा वापर करा!नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील ग्रामीण भागात शेतकºयांनी मतदान करून सत्ताधाºयांना निवडून दिले. अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झाल्याने निवडून देणारा शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत असल्याच्यावेळी पीक नुकसानाचे तातडीने फोटो पंचनामे करण्यासाठी मुख्यमंत्री ‘वॉर रुम’ यंत्रणेचा वापर करावा, त्यासाठी ‘वॉर रुम’ अंतर्गत बुथप्रमुख, शक्तीप्रमुख व विधानसभा मतदारसंघ विस्तारकांना कामी लावून गावनिहाय पीक नुकसानाच्या फोटो पंचनाम्याची माहिती संकलीत करून, शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत तातडीने द्यावी, अशी मागणीही किशोर तिवारी यांनी केली आहे.

 

टॅग्स :Kishor Tiwariकिशोर तिवारीAkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती