शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

उर्दू माध्यम ५३, प्राथमिकच्या ११ शिक्षकांचे विभाग स्तरावर समायोजन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 13:05 IST

जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या ५३ आणि प्राथमिकच्या ११ अतिरिक्त शिक्षकांचे शिक्षण उपसंचालकांच्या स्तरावर समायोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद यांनी दिली.

अकोला: शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयातर्फे मंगळवारी मराठी माध्यमाच्या ६२ शिक्षकांचे जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये समायोजन करण्यात आल्यानंतर आता जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या ५३ आणि प्राथमिकच्या ११ अतिरिक्त शिक्षकांचे शिक्षण उपसंचालकांच्या स्तरावर समायोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद यांनी दिली.जिल्ह्यात मराठी माध्यमाचे ६३ आणि उर्दू माध्यमाचे ६३ असे एकूण १२६ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. शिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या संचमान्यता पडताळणी, सेवाज्येष्ठतेनुसार १२६ अतिरिक्त शिक्षकांमधील १७ शिक्षकांचे यादीतून नाव कमी झाल्यामुळे ही संख्या १0९ वर आली होती. यातही पुन्हा शिक्षकांच्या हरकती, आक्षेपांवर सुनावणी घेत, शिक्षणाधिकारी मुकूंद यांनी अतिरिक्त शिक्षकांना त्यांच्याच शाळेतील रिक्त पदांवर पदस्थापना दिली. त्यामुळे मराठी माध्यमाच्या ६२ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. उर्दू माध्यमाचे ५३ अतिरिक्त शिक्षक आणि प्राथमिकच्या ११ शिक्षकांचे समायोजन जिल्हा स्तरावर न करता, अमरावती विभागाच्या शिक्षण उपसंचालक स्तरावर करण्यात येणार आहे. त्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात विविध शाळांमध्ये असलेली ६0 रिक्त पदांची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयात कळविण्यात येणार आहे, तसेच त्या ठिकाणावरील रिक्त जागांवर शिक्षकांचे विषय, माध्यम आणि बिंदूनामावलीनुसार समायोजन करण्यात येणार आहे. उर्दू शिक्षकांच्या जिल्ह्यात रिक्त जागा कमी असल्यामुळे त्यांचे इतर जिल्ह्यांमधील रिक्त पदांवरसुद्धा समायोजन होऊ शकते. विभाग स्तरावर समायोजन होणार असल्याने, उर्दू शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. (प्रतिनिधी) 

मराठी माध्यमांच्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आटोपल्यानंतर जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या व प्राथमिकच्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन विभाग स्तरावर होणार आहे. त्यामुळे रिक्त पदांची माहिती शिक्षण उपसंचालकांना कळविण्यात येईल.-प्रकाश मुकूंद, शिक्षणाधिकारी.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक