शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 10:54 IST

हाताशी असलेल्या पिकांचे वाºयासह गारपिटीने पिकांचे नुकसान झाल्याने राहिलेल्या पिकांना लावलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळासह गारपीट झाल्याने कपाशी, तूर, हरभरा व गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.नया अंदुरा : नया अंदुरा परिसरात २ जानेवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह गारपीट झाली. हरभरा, गहू, कपाशी व तूर या पिकांच्या पानांची चाळणी झाली. त्यामुळे पिकांना लावलेला खर्चही निघत असल्याची शक्यता वाढल्याने नया अंदुरा, कारंजा, रमजानपूर, निंबा फाटा शेतशिवारातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिसरातील परतीच्या पावसाने आधीच सोयाबीन, उडीद व मूग या पिकांचा हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना तूर, कपाशी व रब्बी हंगामातील हरभरा व गहू या पिकांकडून मोठी आस होती; परंतु अचानक २ जानेवारी रोजी पहाटे अचानक विजेच्या कडकडाटासह वादळवाºयासह गारपीट झाली. त्यामुळे हाताशी असलेल्या पिकांचे वाºयासह गारपिटीने पिकांचे नुकसान झाल्याने राहिलेल्या पिकांना लावलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. सतत शेतकºयांचे नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने पिकांचा सर्व्हे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.गत आठवड्यापासून परिसरात ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर धुके आणि आता पाऊसही पडला आहे. काही पिकांना पाऊस, थंडी व धुक्याचा फटका बसत आहे. धुक्यामुळे पिकावरील पात्यांवर मोठ्या प्रमाणात दव जमा होत आहे. दरवर्षी वाढता उत्पादन खर्च आणि प्रत्यक्षात हाती येणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही. निसर्गाचा लहरीपणा, पाऊस आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. (वार्ताहर)

पहाटे गारपीट बोरगाव वैराळे, अंदुरा शेतशिवारात गुरुवारी पहाटे गारपीट झाली. अचानक विजेचा कडकडाट होऊन जोरदार वादळवारा सुटला आणि पाऊस पडायला सुरुवात झाली. या गारपिटीमुळे गहू आणि हरभरा या पिकांना फटका बसला आहे. यावर्षी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकाकडून मोठी आशा असताना रब्बी पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला.४बाळापूर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी यावर्षी संकटात सापडला आहे. खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी व कपाशी पिकांना सततच्या पावसाचा फटका बसला. शेतीला यावर्षी मोठा खर्च लागला असून, पिकांचे मातेरे झाल्याने लावलेला खर्चही वसूल झाला नाही.४कपाशीवर बोंडअळीची सुरुवात झाल्याने परिसरातील कपाशीचे पीक धोक्यात आले आहे. महागड्या कीटकनाशकांची फवारणी करूनही ही कीड नियंत्रणात येण्याची शक्यता नाही. बोंडे तयार होण्याच्या अवस्थेत असताना अळीने आक्रमण केले आहे. नव्याने तयार होत असलेली कपाशीची बोंडे किडलेली दिसून येत आहेत. त्यामुळे हताश होऊन शेतकरी कपाशीच्या पिकात जनावरे सोडून उलंगवाडी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. हातरूण

बोरगाव वैराळे, अंदुरा परिसरात गुरुवारी पहाटे वादळवारा व पावसाने हजेरी लावली. बोरगाव वैराळे परिसरात गारपीट झाल्याने रब्बी पिकांचे नुकसान झाले. आठवडाभरात पावसाने दुसºयांदा हजेरी लावली. ग्रामीण भागात गुरुवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास विजांचा कडकडाट, वादळवाºयासह अवकाळी पाऊस झाला. वादळवारा आणि अवकाळी पाऊस यामुळे तूर, हरभरा, कापूस पिकांचे नुकसान झाले आहे. बाळापूर

तालुक्यातील हातरूण, बोरगाव वैराळे, दुधाळा, मंडाळा, लोणाग्रा, हातला, निमकर्दा, मांजरी, अंदुरा, शिंगोली, मालवाडा भागात अवकाळी पाऊस झाला. तूर, हरभरा, गहू, ओवा व कपाशी या पिकांना वादळवारा व अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरीHailstormगारपीट