वाशिम : कारंजा तालुक्यातील पिंप्री मोडक येथील आश्रमशाळेतील एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर अधीक्षकानेच अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी धनज बु. पोलिसांनी अधीक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. पिंप्री मोडक येथील निवासी आश्रमशाळेचा अधीक्षक वसंत सोळंके पीडित १२ वर्षीय विद्यार्थ्याला १५ दिवसांपासून त्रास देत होते. ३0 डिसेंबरच्या मध्यरात्री दारू पिऊन तो या विद्यार्थ्याच्या खोलीत गेला. त्या वेळी ४0 मुले या खोलीत झोपली होती. परंतु, दमदाटी करीत सोळंकेने आपल्याशी बळजबरी कुकर्म केले, असे कामरगाव येथील रहिवासी असलेल्या पीडित मुलाने तक्रारीत म्हटले आहे.
अधीक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार
By admin | Updated: January 6, 2016 02:02 IST