शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉक; तीन महिन्यांनंतर रविवारी उघडणार ‘सलून’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 10:00 IST

कोरोना प्रतिबंधात्कम उपायाची अंमलबजावणी होईल, यासाठी दक्षता घेण्याचे नियोजन अनेक दुकानदारांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना संकटाच्या काळात लॉकडाऊन उघडल्यानंतर अनेक व्यवसायांना परवानगी मिळाली; मात्र सलून व्यवसायावरील बंधन कायम राहिले. हातावर पोट असलेल्या या व्यवसातील हजारो कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधनच हिरावले होते; मात्र २८ जूनपासून आता सलून व्यवसाय पुन्हा सुरू होत असल्याने शुक्रवारी अकोल्यातील सलून दूकाने साफसफाई तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी दुकानदारांनी उघडली होती.अकोला शहरात जवळपास ८०० सलूनची दुकाने आहेत. प्रत्येक दुकानावर काम करणारे अनेक कारागीर हे ग्रामीण भागातून आलेले आहेत. त्यामुळे शहरात भाड्याचे घर अन् भाड्याचे दुकान हा प्रमुख खर्च या कारागिरांच्या समोर असतो. लॉकडाऊनच्या तीन महिन्यात या कारागिरांचे उत्पन्नच ठप्प झाल्याने अनेकांना तात्पुरता भाजी विक्रीसारखा पर्यायी व्यवयास शोधावा लागला; मात्र सर्वांनाच ते जमले नाही. त्यामुळे दुकाने कधी उघडतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. अखेर २८ जूनपासून केवळ कटिंगसाठी का होईना दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळाल्याने नाभिक समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी जवळपास सर्वच दुकानांमध्ये साफसफाई सुरू होती. अनेकानी सॅनिटायझरने फवारणी करून दुकाने निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला. एरव्ही रविवार हा गर्दीचा दिवस असतो व आता रविवारीच दुकाने सुरू होणार असल्याने ग्राहकांची गर्दी होणार नाही, कोरोना प्रतिबंधात्कम उपायाची अंमलबजावणीसुद्धा होईल, यासाठी दक्षता घेण्याचे नियोजन अनेक दुकानदारांनी केले.

दर वाढतीलकोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक ग्राहकाला नवीन वस्तरा, नवीन अ‍ॅप्रन द्यावी लागणार आहे, त्यामुळे साहजिकच हा वाढीव खर्च ग्राहकांनाच करावा लागणार आहे.त्यामुळे कटिंग, दाढी, फेशिअल अशा सर्वच ग्राहक सेवेचे दर वाढवावे लागतील, असे नाभिक समाज दुकानदार संघटनेने स्पष्ट केले आहे.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी वापरा आणि फेकून द्या, अशा स्वरूपातील साहित्य ग्राहकांना पुरविले जाणार आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा अधिक दर आकारले जाणार आहेत. सर्व सलूनधारकांनाही प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली आहे. त्याचे पालन करण्याचेही आवाहन केले आहे. ग्राहक सकारात्मक प्रतिसाद देतील, असा विश्वास आहे.- गजानन वाघमारेअध्यक्ष नाभिक समाज दुकानदार संघटना

ग्राहकांना सेवा देताना ती अधिक सुरक्षित असावी यासाठी दुकानाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तीन महिन्यांपासून रोजगार ठप्प झाला होता. आता रविवारपासून पुन्हा नव्या उमेदीने दुकाने सुरू होत असल्याने आनंद वाटत आहे.- प्रकाश आंबुस्कर,सलून मालक

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक