शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अकोला रेल्वे स्थानकावर अज्ञात व्यक्तीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 18:02 IST

अकोला : एका २४ वर्षीय माथेफीरू युवकाने अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चार वरील बाकड्यावर झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यात लोखंडी पाईपने वार करून खून केला.

अकोला : एका २४ वर्षीय माथेफीरू युवकाने अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चार वरील बाकड्यावर झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यात लोखंडी पाईपने वार करून खून केला. ही घटना शुक्रवार ७ जून रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली. तासाभरातच आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले.प्राप्त माहितीनुसार, अकोला रेल्वे स्थानकावर नेहमी प्रमाणे शुक्रवारीही सकाळपासूनच प्रवाशांची गर्दी वाढू लागली होती. सकाळी प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरील एका बाकड्यावर एक व्यक्ती झोपलेला होता. सकाळी ९ वाजताच्या दरम्यान एका २५ वर्षीय माथेफीरू एल. भेन नामक युवकाने अचानक त्याच्या डोक्यावर व चेहऱ्यावर लोखंडी पाईपने वार केला. या घटनेमुळे प्रवाशी गोंधळले अन् धावपळ सुरू झाली. या घटनेत बाकड्यावर झोपलेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यु झाली. मृतकाची ओळख पटली नाही. मृतक हा रेल्वे स्थानकावरील भीकारी असल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपीने यासाठी रेल्वे स्थानक परिसरातीलच लोखंडी पाईपचा उपयोग केला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करुन पोलिसांनी आरोपीला अकोट फैल परिसरातून अटक केली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपी विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.आरोपी झारखंडचा रहिवासीघटनेतील आरोपी एल. भेन नावाचा युवक असून, तो झारखंड येथील रहिवासी आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीतून आरोपी हा मतीमंद असल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीMurderखूनAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक