शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात पाच लाखांचा गुटखा जप्त; गुटखा माफियांविरुद्ध कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 01:12 IST

अकोला : राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची पोलिसांच्याच  आशीर्वादाने शहरासह जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात खरेदी-विक्री होत  असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. राधाकृष्ण टॉकीजसमोर मूर्तिजापूरवरून  येत असलेला तब्बल चार लाख रुपयांचा गुटख्याचा साठा वाहतूक  पोलिसांनी गुरुवारी दुपारी जप्त केला. या प्रकरणात खदान पोलीस ठाण्यात  गुटखा माफियांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू होती.

ठळक मुद्देई-वे बिलिंगला दे धक्का‘विमल’चा सौदागर ‘दिलीप’

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची पोलिसांच्याच  आशीर्वादाने शहरासह जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात खरेदी-विक्री होत  असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. राधाकृष्ण टॉकीजसमोर मूर्तिजापूरवरून  येत असलेला तब्बल चार लाख रुपयांचा गुटख्याचा साठा वाहतूक  पोलिसांनी गुरुवारी दुपारी जप्त केला. या प्रकरणात खदान पोलीस ठाण्यात  गुटखा माफियांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू होती.मूर्तिजापूर येथील बडा गुटखा माफिया अग्रवाल याच्याकडून रजपूतपुर्‍या तील रहिवासी नरेंद्र चमनलाल अग्रवाल व संतोष अशोकसिंग ठाकू र या  दोघांनी तब्बल तीन लाख रुपयांचा गुटखा खरेदी करून तो ओमनी  कारमध्ये भरला. त्यानंतर एमएच ३0 एल २८४४ या क्रमांकाची ओमनी  कार गुटख्याचा साठा घेऊन येत असल्याची माहिती वाहतूक शाखेचे प्रमुख  विलास पाटील यांना मिळताच त्यांनी कर्मचार्‍यांना ओमनी कारच्या पाळ तीवर ठेवले. कार राधाकृष्ण टॉकीजसमोर येताच वाहतूक पोलिसांनी  अडविली. त्यानंतर कारची झडती घेतली असता यामध्ये गुटख्याचा साठा  आढळला. यामध्ये विमल गुटख्याचे १0 पोते, काली पान बहार गुटख्याचे  दहा पोते, तंबाखू १0 पोते अशाप्रकारे तीन लाख रुपयांचा गुटखा व ओमनी  कार असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही  कारवाई वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात  आली. यापूर्वी चार वेळा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी गुटखा साठा व देशी  व विदेशी दारू जप्त केलेली आहे.

ई-वे बिलिंगला दे धक्काशहरासह जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात गुटख्याचा साठा आणण्यात येत आहे.  प्रतिबंधित असलेला गुटख्याचा साठा आणताना ई-वे बिलिंगला दे धक्का  देण्यात येत आहे. ई-वे बिलिंग न घेताच गुटख्याची मोठय़ा प्रमाणात खरेदी- विक्री होत असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा कर चोरी करण्यात येत  आहे. त्यामुळे सदर गुटखा प्रकरणात जीएसटी कार्यालयाने ई-वे  बिलिंगसंदर्भात कारवाई करणे अपेक्षित आहे.

‘विमल’चा सौदागर ‘दिलीप’विमल गुटख्याची निर्मिती करणार्‍या कंपनीसोबत अकोल्यातील दिलीप  नामक व्यक्तीचे थेट संबंध असल्याचे आता उघड झाले आहे. लाखो रु पयांचा कर चोरी करून हा गुटखा अकोल्यात आणण्याचे काम दिलीपचेच  असून, रोज एक मोठा ट्रक अकोल्यात उतरविण्यात येत असल्याची माहिती  सूत्रांनी दिली; मात्र याकडे जीएसटी कार्यालयाने अद्यापही लक्ष दिले  नसल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrimeगुन्हा