शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

निरंकुश सायबर कॅफे!

By admin | Updated: December 3, 2014 01:16 IST

लोकमत स्टिंग ऑपरेशन: नेट सर्फिंगसाठी मागितले जात नाही ओळखपत्र.

अकोला- इंटरनेट कॅफेच्या माध्यमातून सायबर गुन्हे घडत असल्याचा अहवाल सीआयडीने दिला आहे. या गुन्ह्यामध्ये अकोला राज्यात आठव्या क्रमांकावर असून, याच पृष्ठभूमीवर ह्यलोकमतह्णच्या प्रतिनिधींनी मंगळवारी शहरातील इंटरनेट कॅफेवर पाहणी केली असता, नेट सर्फिंगसाठी येणार्‍यांची ओळख पटवून घेण्याबाबत नेट कॅफे संचालक गंभीर नसल्याचे आढळून आले. कॅफेवर नेट सर्फिंग करणार्‍यांवर कोणताही अंकूश नसल्यामुळे सायबर गुन्हय़ांमध्ये वाढत होत असल्याचे निदर्शनास आले.अकोला शहरात सुमारे २५0 च्या आसपास इंटरनेट कॅफे असून, यामधील शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नेट कॅफेवर ओळखपत्र मागितले; मात्र जुने शहर, जयहिंद चौक, कौलखेड, गौरक्षण रोड, तोष्णीवाल ले-आउट, मोठी उमरी, जठारपेठ, रामदास पेठ आणि रेल्वे स्थानक परिसरातील नेट कॅफेवर ओळखपत्र न मागताच संगणक उपलब्ध करून दिले जात असल्याचे आढळून आले. यावरून इंटरनेट कॅफे संचालक नेट सर्फिंगसाठी येणार्‍यांची ओळखपटवून घेणे आणि त्याची नोंद ठेवण्याबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले. लोकमतच्या प्रतिनिधींनी शहरातील प्रातिनिधीक स्वरुपात १५ प्रमुख इंटरनेट कॅफेची पाहणी केली. यामधील केवळ दोन इंटरनेट कॅफेवर ओळखपत्र मागण्यात आले, तर इतर १३ इंटरनेट कॅफेवर ओळखपत्र मागितले नाही. कुठल्याही नेट कॅफेवर प्रतिनिधींनी नेटसर्फिंग केल्याची नोंद करण्यात आली नाही. शहरातील ठाणेदारांना सायबर क्राइम रोखण्यासाठी नेट कॅफेवर नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे असले तरी पोलीसांकडून कधीही नेट कॅफे संचालकांकडून नियमांचे पालन केले जाते किंवा नाही याची तपासणी केली जात नाही. कॅफेमध्ये ग्राहकाने प्रवेश केल्यानंतर त्याला संगणकासमोर बसू देण्याआधी त्याचे ओळखपत्र बघायला हवे. कॅफेमध्ये आलेल्या ग्राहकाने काय काम केले, याची संपूर्ण माहिती ठेवायला हवी. कॅफेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असायला हवे आदी नियमांचा समावेश आहे. मात्र, या नियमांचे पालन होत नसल्याचे लोकमतने केलेल्या पाहणीत आढळून आले.दोन वर्षांत घडले ४३ सायबर गुन्हेजिल्ह्यात गत दोन वर्षांच्या काळात तब्बल ४३ सायबर गुन्हे दाखल झाले आहेत. २0१३ या एका वर्षात २0 सायबर गुन्हे घडले असून, २0१४ च्या नोव्हेंबरपर्यंत २३ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामूळे सायबर गुन्हे आता पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. फेसबूकसारखे सोशल नेटवर्किंग व विवाह जुळविणार्‍या विविध सोशल साइटवर युवतींची फसगत वाढत चालली असून, याच सोशल नेटवर्किंग साइटवर विविध देवतांच्या प्रतिमा अपलोड करून धार्मिक भावना भडकावण्याचे प्रकार होत आहेत.