शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून मामाने भाचीलाच पळविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 02:33 IST

अकोला :  सख्ख्या मामानेच रक्ताच्या नात्यातील बहिणीच्या मुलीलाच प्रेमजाळय़ात ओढून तिला अकोल्यात पळवून आणले. मामा व भाची पुण्याला पळून जाण्याच्या बेतात असतानाच, दामिनी पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी घडली. 

ठळक मुद्देपुण्याला पळून जाण्यापूर्वीच घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  सख्ख्या मामानेच रक्ताच्या नात्यातील बहिणीच्या मुलीलाच प्रेमजाळय़ात ओढून तिला अकोल्यात पळवून आणले. मामा व भाची पुण्याला पळून जाण्याच्या बेतात असतानाच, दामिनी पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी घडली. अलिकडच्या काळात कोणालाही नात्याचे भान राहिले नाही. नात्यालाच काळीमा फासण्याच्या घटना वाढत आहेत. पिताच आपल्या मुलीवर वाकड्या नजरेने पाहतो. तिला वासनेचे शिकार बनवितो. या घटनांमुळे नात्यांमधील विश्‍वास, नैतिकता, प्रेम, वात्सल्य..सर्व काही धुळीस मिळत आहे. कर्नाटक राज्यातील रामतांडा गावामध्ये राहणार्‍या बहिणीच्या १८ वर्षीय मुलीवरच सख्ख्या मामाने वाकडी दृष्टी टाकली. मुलीसारखी असणार्‍या या युवतीला मामाने प्रेमजाळय़ात ओढले. नात्याचा कसलाही विचार न करता, त्यांनी लग्न करण्याचे ठरविले; परंतु गावात राहून आपले लग्न होणार नाही, या विचाराने दोघांनी राज्याबाहेर पळून जाण्याचा निश्‍चय केला. मामाने आपल्या भाचीला पळवून आणले. सोलापूरला दोघे काही दिवस राहिल्यावर तेथून ते काही दिवसांपूर्वी अकोल्यात आले आणि बुधवारी दुपारी पुण्याला जाण्यासाठी नवीन बसस्थानकावर आले. या ठिकाणी गस्तीवर असलेल्या दामिनी पथकाला हे जोडपे संशयास्पद स्थितीत दिसून आले. दामिनी पथकातील महिला पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आणि सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात आणले. या ठिकाणी दोघांची चौकशी केल्यावर मामाने त्याचे नाव, संजु देलु राठोड असल्याचे सांगत, लग्नाचे आमिष दाखवून भाचीला पळविल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.  दोघांचेही एकमेकांवर प्रेम असल्याचेही पोलिसांना कळले. पोलिसांनी मामावर प्रतिबंधात्मक कारवाई करून युवतीच्या कुटुंबियांना माहिती कळविली. युवतीला तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. 

अश्लील चाळे करणारे प्रेमी युगुल ताब्यातनेहरू पार्कमध्ये अश्लील चाळे करणार्‍या दोन प्रेमी युगलांना दामिनी पोलीस पथकाने बुधवारी सायंकाळी पकडले आणि खदान पोलीस ठाण्यात आणले. प्रेमीयुगलांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून मुलींना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. दोन अल्पवयीन मुली व दोन युवक नेहरू पार्कमध्ये अश्लील चाळे करीत असल्याची माहिती दामिनी पोलीस पथकाला मिळाली. त्यांनी या दोन्ही जोडप्यांना ताब्यात घेतले. सदर युवक हे नाशिक येथील रहिवासी आहेत. तर युवती शहरातीलच राहणार्‍या आहेत. शाळेमध्ये फॉर्म भरण्यासाठी जात असल्याचे सांगून या दोनही मुली आपल्या प्रियकरांसह नेहरू पार्कमध्ये आल्या होत्या. याठिकाणी अश्लील चाळे करीत असल्याचे तेथील काही लोकांना दिसले. त्यांनी दामिनी पोलीस पथकाला माहिती दिली. 

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक