शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

अकोटात दगडफेक; तणावपूर्ण शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 01:28 IST

अकोट : अकोट शहरातील पानअटाई ते घसेटीपुरा या भागात ९  नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास काही युवकांमध्ये  वादविवाद होऊन दगडफेकीची घटना घडली.

ठळक मुद्देदंगलीच्या अफवांमुळे पळापळबाजारपेठ बंद; १0 जणांना  अटक

अकोट : अकोट शहरातील पानअटाई ते घसेटीपुरा या भागात ९  नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास काही युवकांमध्ये  वादविवाद होऊन दगडफेकीची घटना घडली. या घटनेमुळे  दंगलीची अफवा पसरल्याने पळापळ होऊन शहरातील बाजारपेठ  बंद झाली होती. घटनास्थळावर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश  कलासागर, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकांत सागर  यांच्यासह पोलीस ताफा पोहोचला आहे.या दगडफेक प्रकरणी १0  जणांना रात्री उशीरा अटक करण्यात आली.घसेटीपुरा व डोहोरपुरा परिसरातील काही युवकांमध्ये गुरुवारी  रात्री ८ वाजता क्षुल्लक कारणावरून वादविवाद झाल्याचे बोलले  जात आहे. या वादविवादातून एकमेकांवर दगडफेक करण्यात  आली. या घटनेबाबत शहरात मात्र दंगल सुरू झाल्याची अफवा  पसरल्यामुळे पळापळ झाली. अवघ्या काही मिनिटांत अकोट  शहरातील बाजारपेठ बंद झाली. सदर घटनेची माहिती मिळताच  पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी तातडीने पोलीस ताफ्यासह  घटनास्थळ गाठले; परंतु दरम्यानच्या काळात क्षुल्लक कारणावरून  दगडफेक करणारे युवक घटनास्थळावरून पसार झाले होते.  घटनास्थळावर प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी गावीत,  एलसीबी प्रमुख कैलास नागरे, अकोट ग्रामीण पोलीस निरीक्षक  मिलिंद बहाकर यांच्यासह हिवरखेड, दहीहांडा येथील अतिरिक्त  पोलीस ताफा पोहोचला होता. घसेटीपुरा व पानअटाई यादरम्यान  झालेल्या दगडफेकीचे लोण पसरू नये म्हणून पोलिसांनी सर्वत्र  बंदोबस्त लावला असून, शहरात सद्यस्थितीत शांतता आहे. 

अफवांना आळा कधी बसणार?अकोट शहरात सतत उलटसुलट अफवा उठविल्या जातात.  दोघांमध्ये आपसात वादविवाद जरी झाला, तरी सार्वत्रिकपणे जा तीय स्वरूप देऊन अफवा पसरविल्या जातात. त्यामुळे व्यापारी  व नागरिकांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतो, तसेच  शहराच्या शांततेला गालबोट लागून बाजारपेठ बंद होऊन पळा पळ होते. अशा स्थितीत शहरवासीयांनी सामंजस्य राखून  अफवांना बळी न पडता शहरात शांतता ठेवणे गरजेचे आहे, तर  दुसरीकडे पोलिसांनी अफवा पसरविणार्‍यांचा शोध घेऊन कठोर  कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे बोलल्या जात आहे. 

हा प्रकार क्षुल्लक कारणावरून घडला असावा. घटनेचे नेमके  कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नागरिकांनी कोणत्याही  अफवांवर विश्‍वास ठेवू नये. पोलिसांना सहकार्य करावे. - विजयकांत सागर, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक, अकोला. 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस