खामगाव : भरधाव मिनीट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना आज राष्ट्रीय महामार्गावर खामगाव ते नांदुरा दरम्यान लांजूड फाट्यानजीक घडली. याप्रकरणी पोलिसांनी मिनीट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आमसरी ता.खामगाव येथील विजय सुधाकर वासनकर (वय ४0) व नारायण संपत खाडे हे दोघे दुचाकी क्रमांक एम.एच.२८ एबी १५७५ ने खामगाव येथे बँकेच्या कामानिमित्त येत होते. दरम्यान, लांजूड फाट्यानजीक या दुचाकीस्वारांना रेती घेऊन जात असलेल्या भरधाव मिनीट्रकने धडक दिली. यामुळे विजय वासनकर हे जागीच ठार झाले तर नारायण खाडे हे गंभीर जखमी झाले. या जखमींना शिवाजी फरफट, गजानन कोळसकार, नंदू जाणे, विनोद कुटे आदींनी उपचारासाठी खामगाव ये थील सामान्य रुग्णालयात दाखल केले. तसेच या घटनेची माहिती जलंब पोलिसांना दिली. अपघा तानंतर फरार झालेल्या वाहनचालकास अटक करावी, यासाठी रास्तारोको केला; मात्र ठाणेदार माकोडे यांनी फरार वाहनचालकास अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्तारोको मागे घेण्यात आला.
मिनीट्रकच्या धडकेत दुचाकी स्वार ठार, एक गंभीर
By admin | Updated: September 28, 2014 00:29 IST