शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावर ट्रक अपघात दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 12:38 IST

Murtijapur Accident News : राष्ट्रीय महामार्गावर ट्रकखाली दबल्याने दुचाकीस्वार ठार झाला.

मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावरील ग्राम सोनोरी जवळ अरूंद पुलावर झालेल्या अपघात दुचाकीस्वार ट्रकखाली दबून जागीच ठार झाल्याची घटना २८ जून रोजी सकाळी घडली. शेख इम्रान शेख रहेमान (३२) राहणार काटेपूर्णा असे मृतकाचे नाव आहे.      तालुक्यात अपघाताची श्रृंखला चालुच असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे दुसऱ्या दिवशीही दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. सोमवारी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान शेख इम्रान राहणार काटेपूर्णा रेल्वे स्टेशन हे आपल्या दुचाकी क्रमांक एमएच ३० ए डब्ल्यू ५८३७ ने मूर्तिजापूर येथे येत असताना अकोल्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक क्रमांक एमपी एचएच ४९४४ चा अचानक टायर फुटल्याने ट्रक रस्त्यात उलटला असता मागच्या बाजूने येणाऱ्या एमएच ०४ सीजी ५०८७ क्रमांकाच्या ट्रकने समोरच्या ट्रकला लगेच ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न केला परंतु सदर ट्रक शेख इम्रान यांच्या दुचाकीवर जाउन उलटला त्याखाली दबून शेख इम्रान याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शेख इम्रान हे बडनेरा येथे रेल्वेत नौकरीवर असून ड्यूटीवर जाण्यासाठी ते मूर्तिजापूर येथे येत होते इथून मेलने बडनेरा जाणार होते त्यांचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. परंतु काळाने त्यांच्यावर रस्त्यातच घाला घातला. दरम्यान काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती कळताच वंदेमातरम आपत्कालीन पथक काटेपूर्णा व मूर्तिजापूर आणि वंचित आघाडी आपत्कालीन मूर्तिजापूर यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात आणला.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAccidentअपघात