मूर्तिजापूर : शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खरब ढोरे मार्गावर एका ५५ वर्षीय दुचाकीस्वारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना रविवारी ३ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. येथील स्टेशन विभागातील सत्संग भवन परिसरात राहणारे दशरथ राम सुपले हे संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास आपल्या शेतातून एमएच ३० एजी १४४६ या क्रमांकाच्या दुचाकीवरुन घरी परत येत असताना अंधारात अज्ञात वाहनाने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने त्यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली. त्यात ते घटनास्थळीच गतप्राण झाले. ग्रामस्थांनी येथील वंदेमातरम आपत्कालीन पाचारण करुन त्यांना तातडीने लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक; एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 20:38 IST