मूर्तिजापूर : येथून भाजीपाला विकून दुचाकीवरुन घरी परत जाताना पाठीमागून येणाऱ्या मालवाहू ४०७ वाहनाने दुचाकीस्वार शुभम जगदीश वाकोडे (२१), राहणार जामठी (हातगाव ) हा गंभीररीत्या जखमी झाला. घटना ६ जानेवारी रोजी ११:३० वाजताच्या सुमारास कारंजा रोडवर हातगाव नजीक लक्ष्मी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी समोर घडली. तालुक्यातील हातगाव जामठी येथील युवक शुभम जगदीश वाकोडे (२१) हा भाजीपाला विकण्यासाठी मूर्तिजापूर येथे आला होता. तो सकाळी ११:३० वाजताच्या दरम्यान दुचाकी क्रमांक एमएच ३० एक्स ४६३३ ने घरी परत जाताना पाठीमागून येणाऱ्या मालवाहू वाहन ४०७ क्रमांक एमएच २९ एम १००८ ने हातगाव जवळ लक्ष्मी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी समोर जोरदार धडक दिल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला. त्या तातडीने येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. काही काळासाठी या रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या प्रकरणी संतापलेल्या नागरीकांची शहर पोलीसांनी मनधरणी करुन करुन रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
मालवाहू वाहनाची दुचाकीस धडक; युवक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 15:52 IST
Accident News घटना ६ जानेवारी रोजी ११:३० वाजताच्या सुमारास कारंजा रोडवर हातगाव नजीक लक्ष्मी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी समोर घडली.
मालवाहू वाहनाची दुचाकीस धडक; युवक गंभीर जखमी
ठळक मुद्देशुभम जगदीश वाकोडे (२१) हा भाजीपाला विकण्यासाठी मूर्तिजापूर येथे आला होता. मालवाहू वाहनने जोरदार धडक दिल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला.वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.