शिर्ला : भरधाव दोन ट्रकची अमोरासमोर धडक झाल्याने चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना ८ डिसेंबर रोजी रात्री पातूर ते मालेगाव महामार्गावर घडली. दोन्ही ट्रकच्या चालकांसह क्लिनरचा जखमींमध्ये समावेश आहे. जखमींना तातडीने उपचारार्थ दाखल करण्यात आले.पातूरकडून ट्रक क्र.एमएच ३० -३८८६ दाळ घेउन परभणीकडे जात होता. वाशिम वरून पातूरकडे ट्रक क्र.९ एचएफ ०५१३ सरकी घेउन येत होता. दरम्यान पातूर ते मालेगाव महामार्गावर एका ढाब्यासमोर दोन्ही ट्रकची अमोरासमोर धडक भिषण धडक झाली. यामध्ये विजय पोपटपाटील रा. दहिवेळ,ता. सारवरे जिल्हा धुळे,बळीराम रमेश सोळंके रा. मोटला तालुका पूनासा जिल्हा खंडवा ,सोमलाल तोमसिंग भवर रा. सिसोदिया जिल्हा खरगोन हे गंभीर झाले. अपघात एवढा भिषण होता की दोन्ही ट्रकच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला. अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या मध्ये आल्याने वाहतुक विस्कळीत झाली होती. माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेउन जखमींना तातडीने उपचारार्थ हलविले. तसेच विस्कळीत झालेली वाहतुक सुरळीत केली. स्वास संघटनेचे दुलेखान युसूफ खान यांनी रुग्णवाहीकेमध्ये चारही जखमींना सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे दाखल केले. या प्रकरणी वृत्त लिहीस्तोवर पातूर पोलिसात तक्रार झालेली नव्हती. (वार्ताहर)
पातूर ते मालेगाव महामार्गावर दोन ट्रकची अमोरासमोर धडक : चार गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 17:43 IST
पातूर ते मालेगाव महामार्गावर एका ढाब्यासमोर दोन्ही ट्रकची अमोरासमोर धडक भिषण धडक झाली.
पातूर ते मालेगाव महामार्गावर दोन ट्रकची अमोरासमोर धडक : चार गंभीर
ठळक मुद्दे दोन्ही ट्रकच्या चालकांसह क्लिनरचा जखमींमध्ये समावेश आहे.जखमींना तातडीने उपचारार्थ दाखल करण्यात आले.