शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकची अमोरासमोर धडक; चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 16:19 IST

Truck Accident दोन ट्रकचा अमोरासमोर अपघात होऊन एक जण ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान घडली. 

ठळक मुद्देआयशर चालक केबिनमध्ये फसल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.अपघातानंतर सदर आयशर ट्रकने पेट घेतला होता. राष्ट्रीय महामार्गावरील काही तासासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती.

 मूर्तिजापूर : ग्रामिण पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर अनभोरा बस थांब्या नजीक दोन ट्रकचा अमोरासमोर अपघात होऊन एक जण ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान घडली.  गोविंद विश्राम पाल (रा. नागपूर) असे अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. अमरावती कडून अकोला कडे आयशर ट्रक क्रमांक एम.एच.१२ एल.टी.७७३६ हा जात असताना विरुद्ध दिशेने येत असलेल्या  ट्रक क्रमांक एम.एच.३२ एजे,३३५५ याने आयशर ट्रकला समोरून जोरदार धडक दिल्याने आयशर चालक केबिनमध्ये फसल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर सदर आयशर ट्रकने पेट घेतला होता, ग्रामस्थांनी धाव घेऊन सदर आग आटोक्यात आणली. येथील वंदेमातरम आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेऊन दोन तासांच्या परिश्रमानंतर केबिन तोडून मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळविले, दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील काही तासासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीसांनी ती सुरळीत केली. एमएच ३२ एजे ३३५५ च्या चालकाविरुद्ध भरधाव व निष्काळजी वाहन चावल्याने कलम २७९, ३०४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सुभाष उघडे पोलीस शिपाई अनिल अहेरवाल करीत आहे.

टॅग्स :National Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरAccidentअपघात