शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दोन ट्रकच्या अपघातात दोन्ही चालक ठार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 13:35 IST

कुरूम: राष्ट्रीय महामार्गावरील कुरूम गावाजवळ दोन ट्रकची समोरासमोर जबर धडक झाली. यात दोन्ही ट्रकचे चालक ठार झाले. ही घटना गुरुवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली.

कुरूम: राष्ट्रीय महामार्गावरील कुरूम गावाजवळ दोन ट्रकची समोरासमोर जबर धडक झाली. यात दोन्ही ट्रकचे चालक ठार झाले. ही घटना गुरुवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणात माना पोलिसांनी दोन्ही चालकांसह ट्रकच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.पंचदमिया वैशाली (बिहार) येथील प्रकाशकुमार अशोककुमार महतो (२0) याच्या तक्रारीनुसार अमरावतीच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या एमएच ३३-४३६८ क्रमांकाचा ट्रकचालक राकेश लालाजी चौव्हान (२८ रा. मन मवई उत्तर प्रदेश) याने डब्लू बी ११ डी- ९४१ क्रमांकाच्या ट्रकला जबर धडक दिली. या अपघातामध्ये ट्रकचालक रमनकुमार जोगेश्वर रॉय (३0 रा. किरदरपूर बिहार) हा जागीच ठार झाला. रमनकुमार हा कोलकाता येथून डाक पार्सल घेऊन धुळ्याकडे जात होता; परंतु दरम्यान त्याच्या ट्रकच्या अपघात झाला. सोबतच ट्रकचालक राकेश चौहान हा ट्रकमध्ये फसल्यामुळे त्याचे दोन्ही पाय तुटले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला अमरावती येथील रुग्णालयात भरती करण्यात आले; परंतु उपचारादरम्यान राकेशचा मृत्यू झाला. अपघातामुळे महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. माना पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी एमएच ३३-४३६८ क्रमांकाचा ट्रकचालकावर व मालकावर कलम ६५ एई ८१, ८३, १0८ महाराष्ट्र प्रोव्हीशन अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. पीएसआय श्रीकृष्ण पाटील, एएसआय प्रदीप उमक, कर्मचारी दिलीप नागोलकर, नंदकिशोर टिकार, विजय मानकर, नीलेश इंगळे, सचिन दुबे, संदीप पवार, शशिकांत इंगळे तपास करीत आहेत.एका ट्रकमध्ये ११ लाख रुपयांच्या दारूचा साठा!एमएच ३३-४३६८ क्रमांकाच्या ट्रकमधील कॅबिनच्या मागे असलेल्या एका कप्प्यामध्ये देशी दारूचे ३८५ बॉक्स, ६00 फुटलेल्या दारूच्या बाटल्यांसह देशी दारूच्या शेकडो बाटल्या आढळून आल्या. या दारूची ट्रकसह किंमत ११ लाख रुपये आहे. शासनाचा महसूल बुडवून दारूची अवैध वाहतूक करण्यात येत होती. दारूबंदी निरीक्षक संजय देशमुख यांनी ट्रकची पाहणी करून त्यातील दारू अवैध असल्याचे स्पष्ट केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात