शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

दारूसाठी पैसे मागण्यावरून दोघांची झटापट; डोक्याला मार लागल्याने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 17:18 IST

छातीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर उपचारा दरम्यान त्याचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला.

ठळक मुद्दे प्रविणने त्यांना शिवीगाळ करीत अंगावर हात उगारण्याचा प्रयत्न केला. दोन भावंडांनी प्रवीण कांबळे याला बालुला ढकलले असता तो तोल जाऊन जमिनीवर कोसळला.छाती व डोक्यावर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

अकोला : अकोट फैल परिसरातील भोईपुरा येथील रहिवासी प्रवीण कांबळे हा त्यांच्या शेजारीच राहत असलेल्या गोलू कांबळे आणि अविनाश कांबळे याना दारू पिण्यासाठी रोजच पैसे मागायचा मात्र त्यांनी नकार दिल्याने त्यांनाच शिवीगाळ केल्यानंतर रविवारी दुपारी झालेल्या किरकोळ वादात झालेल्या दोन भावंडानी पंकजला ढकलून दिल्याने तो जमिनीवर कोसळला. यामध्ये त्याच्या छातीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर उपचारा दरम्यान त्याचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. या प्रकरणात अकोट फाईल पोलिसांनी कांबळे पिता पुत्रास अटक केली.अकोट फाइल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोईपुरा येथे असलेल्या मच्छी मार्केटमध्ये प्रवीण विजय कांबळे (वय 40) याने गणेश विश्वनाथ कांबळे यांचा मुलगा गोलू गणेश कांबळे आणि अविनाश गणेश कांबळे यांना 4 जून रोजी दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. त्यावेळी या बाप-लेकांनी प्रवीणला दारू पिण्यास पैसे दिले नाही. या कारणावरुनच प्रवीण कांबळे हा गणेश कांबळे यांच्यासह त्यांच्या कुटूंबीयांना अश्लील शिवीगाळ करत होता.रविवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान गोलू आणि अविनाश हे भोईपुरा परिसरात असताना प्रविणने त्यांना शिवीगाळ करीत अंगावर हात उगारण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोन भावंडांनी प्रवीण कांबळे याला ढकलले असता तो तोल जाऊन जमिनीवर कोसळला.दारूच्या प्रचंड आहारी गेलेल्या प्रवीणची प्रकृती ठीक नसल्याने तो अशक्त होता. अशातच जमिनीवर कोसळल्याने त्याच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे अविनाश कांबळे, गोलू कांबळे याच्यासह परिसरातील नागरिकांनी प्रवीण कांबळे यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रविवारी सायंकाळी उपचार सुरू केल्यानंतर सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास प्रवीण कांबळे यांचा मृत्यू झाला. प्रवीणचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट झाले नसले तरी त्यांच्या किडन्या निकामी झाल्यामुळे तसेच छाती व डोक्यावर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. या प्रकरणात गणेश विश्वनाथ कांबळे त्यांचा मुलगा गोलू गणेश कांबळे आणि अविनाश गणेश कांबळे या तिघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर तीनही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

प्रवीण कांबळे यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आले नाही. गोलू आणि अविनाशसोबत प्रवीण कांबळे याची झटापट झाली होती. या झटापटीत प्रवीण कांबळे खाली कोसळल्याने त्याच्या डोक्याला आणि छातीला मार लागला. उत्तरीय तपासणी अहवाल आल्यानंतरच प्रवीणच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.-मिलिंदकुमार बहाकर ठाणेदार अकोट फाइल पोलीस स्टेशन

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोला