शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

लोहारा येथील दगडफेकीत दोन गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 17:43 IST

लोहारा येथील नवीन प्लाट भागात जुन्या वादातून दोन गटात वाद झाला.

लोहारा/ उरळ : जुन्या वादातून येथील नवीन प्लॉटमध्ये दोन गटात सोमवारी रात्री वाद झाला. या वादातून दोन्ही गटांच्या लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली. यामध्ये दोन्ही गटांचे दोन जण गंभीर तर सात जण किरकोळ जखमी झाले. अर्धा तास दगडफेक सुरू असल्याने गावात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी दोन्ही गटाच्या १९ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, ९ जणांना अटक करण्यात आली आहे. गावात चोख बंदोबस्त लावण्यात आला असून, तणावपूर्ण शांतता आहे. १७ मार्च रोजी पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, एसडीपीओ रोहिणी साळुंखे आदींनी लोहारा येथे भेट देऊन शांततेचे आवाहन केले.लोहारा येथील नवीन प्लाट भागात जुन्या वादातून दोन गटात वाद झाला. या वादातून दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच उरळ पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. तसेच जखमींना तातडीने रुग्णालयात हलविले. दगडफेकप्रकरणी अ. रहीम अ. रहेमान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उरळ पोलिसांनी नीलेश सुभाष घावट, रवी गजानन रायबोये, सुभाष लक्षुमण वावरे, संजय वासुदेव वावरे, मंगेश सुभाष घावट, शिवदास उत्तम वाघ, महादेव नारायण वावरे, राजू शंकर मालटे, पवन उत्तम वाघ यांच्या विरुद्ध भादंवि कलम ३३४ ब, ४५२, ३२५, ३२४, ५०४, ३३६, ३४३, १४५, १४७, १४९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या गटाच्या गजानन निनाजी मालटे यांच्या फिर्यादीवरून आयफाज नईम देशमुख, ताजमोहम्मद बिस्मिल्ला देशमुख, रहीम बने मिया देशमुख, जावेद बाशीत देशमुख, अ. रहीम अ. रहमान देशमुख, हबीब ईसा मिया देशमुख, अक्कू पटेल, रहीम मुनाफ पटेल, अर्शद मुनाफ देशमुख, यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०७, ३२३, १४३, १४४, १४७, १४८, १४९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. यातील ९ जणांना उरळ पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. दंगलीची माहिती मिळताच बाळापूर पोलीस उपविभागीय अधिकारी रोहिणी साळुंके तसेच उरळ ठाण्याचे उपनिरीक्षक किशोर मवसकार, स्थानिक गुन्हे शाखेचे शैलेश सपकाळ आदींनी गावात भेट देऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. गावात सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, तणावपूर्ण शांतता आहे. (वार्ताहर)

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी