शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : दिल्लीच्या कार्यक्रमात सहभागी दोघांनी अकोटात ठोकला होता मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 10:38 IST

दोघांनी तेथून परतल्यानंतर अकोट शहरात मुक्काम ठोकला होता, अशी धक्कादायक माहीती २ एप्रिल रोजी रात्री उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देदिल्ली येथील धार्मिक संमेलनामध्ये राज्यभरातील लोक सहभागी झाले होते. अकोट शहरातील एका नगर मध्ये राहणारा एक तर दुसरा अकोला येथुन अकोट मध्ये एका चौकात घर असलेल्या सासरवाडीत मुक्काम ठोकुन होता.या दोंघांना अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयात रेफर करण्यात आले असुन त्यांचा चाचणी अहवालअद्याप येणे बाकी आहे.
- विजय शिंदेअकोट: राजधानी दिल्लीत गत महीन्यात पार पडलेल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या शेकडो जणांपैकी दोघांनी तेथून परतल्यानंतर अकोट शहरात मुक्काम ठोकला होता, अशी धक्कादायक माहीती २ एप्रिल रोजी रात्री उघडकीस आली आहे. प्रशासनाने अशा दोंघाना हुडकून काढले असुन त्यांची अकोट ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक चाचणी करून अकोला रेफर केले आहे. या दोघांचा संपर्क झाल्याची ठिकाणे शोधुन जंतुनाशक फवारणी व आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत.दिल्ली येथील धार्मिक संमेलनामध्ये राज्यभरातील लोक सहभागी झाले होते. यापैकी अकोट शहरातील एका नगर मध्ये राहणारा एक तर दुसरा अकोला येथुन अकोट मध्ये एका चौकात घर असलेल्या सासरवाडीत मुक्काम ठोकुन होता. या दोंघानीही अकोट शहरात कसा प्रवेश घेतला हा प्रश्न अनुत्तरित आहे. या दोंघाचाही शोध लागला असुन त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन कोरोना चाचणी करण्यात आली आहे. या दोंघांना अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयात रेफर करण्यात आले असुन त्यांचा चाचणी अहवालअद्याप येणे बाकी आहे. दरम्यान या कार्यक्रमाला देशभरातुन उपस्थितांपैकी अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर काही जणांचा मृत्यू झाला आहे. अकोट शहरात दोंघाचा मुक्काम उघडकीस आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या कार्यक्रमाला अकोट येथून कोण गेले होते, याची माहीती स्थानिक पोलीसांकडे नव्हती. तसेच या कार्यक्रमाला कोणीच हजेरी लावली नसुन शहरात कोणी परतले नसल्याची माहीती संबंधितांनी प्रशासनाला दिली होती. दरम्यान, अकोट शहरात महसुल विभाग व नगरपरिषद प्रारंभीपासून युध्दपातळीवर जनजागृती करीत आहे. शहरात दाखल झालेल्यांची तपासण्या करण्यात आल्या असुन, एकही संशयित आढळला नाही.
टॅग्स :akotअकोटAkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस