शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिने उलटले; पण हरभऱ्याचे मिळाले नाही चुकारे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 13:13 IST

दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आधीच संकटात सापडला असताना, हरभºयाचे चुकारे मिळाले नसल्याने शेतकºयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

- संतोष येलकरअकोला : जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील चार खरेदी केंद्रांवर नाफेडमार्फत २५ मेपर्यंत १ हजार २ शेतकऱ्यांकडून २७ हजार ९२ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. हरभरा विकल्यानंतर दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र विकलेल्या हरभºयाचे चुकारे अद्याप शेतकºयांना मिळाले नाही. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आधीच संकटात सापडला असताना, हरभºयाचे चुकारे मिळाले नसल्याने शेतकºयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.आधारभूत किंमत योजनेंतर्गत जिल्ह्यात १५ मार्चपासून नाफेडमार्फत हमीदराने हरभरा खरेदी सुरू करण्यात आली. त्यामध्ये जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्ह्यातील पारस, तेल्हारा, बाळापूर व पातूर या चार खरेदी केंद्रांवर २५ मेपर्यंत १ हजार २ शेतकºयांकडून २७ हजार ९२ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. हरभरा खरेदी सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला; मात्र विकलेल्या हरभºयाचे चुकारे अद्याप मिळाले नाही. दुष्काळी परिस्थितीत आधीच शेतकरी संकटात सापडला असताना येत्या खरीप हंगामातील पेरणीचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. त्यातच विकलेल्या हरभºयाचे चुकारे अद्याप मिळाले नसल्याने, शेतकºयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यानुषंगाने विकलेल्या हरभºयाचे हक्काचे पैसे केव्हा मिळणार, याबाबत शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.सात कोटींचे चुकारे प्रलंबित;मिळाले अडीच कोटी!चार खरेदी केंद्रांवर १ हजार २ शेतकºयांकडून २७ हजार ९२ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. त्यापोटी ६ कोटी ९६ लाख रुपयांचे चुकारे प्रलंबित आहेत. प्रलंबित चुकाºयाच्या रकमेपैकी २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी ‘नाफेड’मार्फत जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे. उपलब्ध रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे. अडीच कोटी रुपयांचे चुकारे अदा करण्यात येणार असले तरी उर्वरित चुकाºयापोटी ४ कोटी ८९ लाख रुपयांची रक्कम नाफेडकडून केव्हा प्राप्त होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नाफेडमार्फत हरभरा खरेदीत जिल्ह्यातील चार खरेदी केंद्रांवर आतापर्यंत १ हजार २ शेतकºयांकडून २७ हजार ९२ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. त्यापोटी एकूण ६ कोटी ९६ लाख रुपयांपैकी २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी नाफेडकडून प्राप्त झाला. उपलब्ध रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. हरभरा खरेदीच्या सर्व चुकाºयाची रक्कम महिन्याभरात शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.-एच. एल. पवार,जिल्हा मार्केटिंग अधिकारी.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी