शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखांवर शेतक-यांना मिळू शकते कर्जमाफी

By admin | Updated: June 5, 2017 02:14 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाने पाठविली शासनाकडे माहिती.

संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पाच एकरापर्यंंत जमीन असलेल्या अल्पभूधारक शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर शासनामार्फत जिल्हानिहाय अल्पभूधारक शेतकर्‍यांची माहिती मागविण्यात आली आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हय़ातील अल्पभूधारक शेतकर्‍यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत रविवारी शासनाकडे पाठविण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हय़ातील दोन लाखांवर अल्पभूधारक शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे.शेतकर्‍यांनी पुकारलेल्या संपादरम्यान, राज्यातील पाच एकरापर्यंत शेतजमीन असलेल्या आणि कर्ज थकीत असलेल्या अल्पभूधारक शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ जून रोजी केली. त्यानुषंगाने शासनामार्फत राज्यातील जिल्हानिहाय अल्पभूधारक शेतकर्‍यांची माहिती मागाविण्यात आली आहे. त्यानुसार अकोला जिल्हय़ातील अल्पभूधारक शेतकर्‍यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ४ जून रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाला पाठविण्यात आली आहे. जिल्हय़ातील सातही तालुक्यांत पाच एकरापेक्षा कमी जमीन असलेल्या अल्पभूधारक शेतकर्‍यांची संख्या २ लाख ३५ हजार ९४९ आहे. त्यानुषंगाने जिल्हय़ातील दोन लाखांवर अल्पभूधारक शेतकर्‍यांना शासनाच्या कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.जिल्हय़ात असे आहेत अल्पभूधारक शेतकरी!तालुका         शेतकरी अकोला       ५६९४0बाळापूर       २५६५७पातूर           २१६७२मूर्तिजापूर    ३४0१३बाश्रीटाकळी २८८३३अकोट         ३९३४0तेल्हारा       २९४९४एकूण        २३५९४९शासनाच्या आदेशानुसार, जिल्हय़ातील पाच एकरापेक्षा कमी जमीन असलेल्या अल्पभूधारक शेतकर्‍यांची माहिती अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे.- श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी.