अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 09:50 AM2020-10-18T09:50:09+5:302020-10-18T09:50:20+5:30

Accident Near Murtijapur दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण ठार झाले.

Two killed in unidentified vehicle crash near Murtijapur | अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन जण ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन जण ठार

Next

मूर्तिजापूर : येथून दयार्पूरला जाणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण ठार झाले. ही घटना १७ आॅक्टोबर रोजी संध्याकाळी ६:४५ वाजताच्या सुमारास रसलपूर (पायटांगी) फाट्याजवळ घडली.
मूर्तिजापूरवरून दयार्पूरकडे एमएच २७ सीई ७९३५ क्रमांकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार संतोष मुथा अखंडे (२५) रा. बोरदा चिखलदरा हा घटनास्थळीच ठार झाला. तर मंगेश रमेश अखंडे (२३) रा. बोरदा चिखलदरा हा गंभीररीत्या जखमी झाला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले असता. तेथे त्याचा मृत्यू झाला. दोघेही दुचाकीस्वार कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे मजुरी कामासाठी आले होते अशी माहिती आहे. घटनास्थळी ग्रामीण पोलिसांसह वंदेमातरम आपत्कालीन पथकाचे नरेश मुगल, सेनापती शेवतकार, विक्की गावंडे, सोनू चौधरी, अक्षय सूर्यवंशी यांनी घटनास्थळ गाठून रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Two killed in unidentified vehicle crash near Murtijapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.