शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 20:23 IST

हा भीषण अपघात बुधवार १२ आॅगष्ट रोजी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास घडला.

मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावरील जामठी फाटा दरम्यान भरधाव ट्रक व कारची अमोरासमोध धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात बुधवार १२ आॅगष्ट रोजी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास घडला.मूर्तिजापूरकडून अमरावतीच्या दिशेने जात असलेल्या एम एच १९ एएफ ६८८९ क्रमांकांच्या कारला विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रक क्रमांक जीजे १० झेड ५००१ ने जोरदार धडक दिली. या धडकेत कारमधुन प्रवास करीत असलेले गणेश जनार्दन जाधव (३५) व एक महिला जागीच ठार झाली. या कारमधून गणेश जनार्दन जाधव, उषा पांडूरंग सोनवणे, शिवकन्या जाधव व सार्थक गणेश जाधव (७), हे चार जण औरंगाबाद येथून नागपूर येथे जात होते. मृतांमध्ये नागपूर येथे आरपीटीएस ला कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिका?्याच्या पत्नी चा समावेश असल्याची माहिती आहे. कार मध्ये दोन महिला असल्याने वृत्त लिहिस्तोवर मृतक महिलेचे नेमके नाव काय हे स्पष्ट होऊ शकले नाही. या अपघातात दोघे जण घटनास्थळीच ठार झाले तर एक महिला व एक ७ वषार्चे बालक गंभीर जखमी झाले आहे. या गंभीर जखमींना अमरावती येथील इरवीन रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. कारच्या काचेवर लागलेल्या ई - पास मुळे कारमधील व्यक्तींचीे नावे कळू शकली. (शहर प्रतिनिधी )

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात