शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
3
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
4
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
5
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
6
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
7
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
8
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
9
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
10
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
11
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
12
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
13
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
14
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
15
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
17
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
18
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
19
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
20
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल

अमरावतीच्या इज्तेमासाठी दोन दिवस विशेष रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 13:54 IST

अकोला : अमरावती जिल्ह्यात ७ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या मुस्लीम बांधवांच्या दोन इज्तेमासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने दोन दिवस विशेष ...

अकोला : अमरावती जिल्ह्यात ७ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या मुस्लीम बांधवांच्या दोन इज्तेमासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने दोन दिवस विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुस्लीम समाजाच्या या कार्यक्रमासाठी अतिरिक्त रेल्वेगाड्या सोडण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याकडे करण्यात आली होती. ती मागणी मान्य करीत रेल्वे प्रशासनाने अधिकृत घोषणा केली असून, ६ आणि ९ डिसेंबर रोजी अतिरिक्त गाड्या धावणार आहेत.गाडी क्रमांक ०१२९५ डाउन मनमाड-बडनेरा विशेष साधारण गाडी शुक्रवार, ६ डिसेंबर रोजी मनमाड येथून १४.५० वाजता निघेल. ती गाडी २३.४५ वाजता बडनेरा येथे पोहोचेल. या गाडीला चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर येथे थांबा राहील. नागपूर-मनमाड विशेष साधारण गाडी वन-वे फेरी चालणार आहे. गाडी क्रमांक ०१२९८ अप नागपूर-मनमाड विशेष साधारण सोमवार, ९ डिसेंबर रोजी नागपूर येथून १७.३० वाजता निघेल, ती दुसऱ्या दिवशी ०४.२० वाजता मनमाड येथे पोहोचेल. या गाडीला वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव येथे थांबा राहील. बल्लारशाह ते बडनेरा विशेष साधारण गाडी वन-वे फेरी राहणार आहे. गाडी क्रमांक ०१२९६ अप बल्लारशाह-बडनेरा विशेष साधारण गाडी ६ डिसेंबर रोजी बल्लारशाह येथून १४.०० वाजता निघेल. ती गाडी १८.३५ वाजता बडनेरा येथे पोहोचेल. या गाडीला चंद्रपूर, वरोरा, वर्धा, धामणगाव येथे थांबा राहील. गाडी क्रमांक ०१२९७ डाउन बडनेरा-बल्लारशाह विशेष साधारण गाडी सोमवार, ९ डिसेंबर रोजी २३.४० वाजता निघेल. दुसºया दिवशी सकाळी ४ वाजता बल्लारशाह येथे पोहोचेल. या गाडीला धामणगाव, वर्धा, वरोरा, चंद्रपूर थांबा राहील.

टॅग्स :Akolaअकोलाrailwayरेल्वे