शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अवैध उत्खनन, शिक्षकांच्या हलगर्जीमुळेच दोन मुलांचा मृत्यू; मुख्याध्यापक, शिक्षक, कंत्राटदारांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 14:26 IST

मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनावर ताशेरे ओढत मुख्याध्यापक, शिक्षक व अवैध उत्खनन करणाऱ्या कंत्राटदाराला जबाबदार धरले आणि त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली.

ठळक मुद्देदाळंबी येथील दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून करूण अंत झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली होती. पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनावर ताशेरे ओढत मुख्याध्यापक, शिक्षक व अवैध उत्खनन करणाऱ्या कंत्राटदाराला जबाबदार धरले आणि त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली.मुख्याध्यापक रामेश्वर वक्टे, संजय कुकडे, प्रभारी मुख्याध्यापक नंदकिशोर ठाकरे, विश्वास राऊत, कंत्राटदार मोहित देशमुख यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०४, ३४ नुसार गुन्हा.

बोरगाव मंजू ( अकोला) -दाळंबी येथील दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून करूण अंत झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली होती. या घटनेचे तीव्र पडसाद शुक्रवारी उमटले. मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनावर ताशेरे ओढत मुख्याध्यापक, शिक्षक व अवैध उत्खनन करणाऱ्या कंत्राटदाराला जबाबदार धरले आणि त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली. दरम्यान, शुक्रवारी सकाळी संतप्त ग्रामस्थांनी घटनेला जबाबदार लोकांवर कारवाईसाठी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल दीड तास रोखून धरत चक्का जाम आंदोलन केले. अखेर या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.दाळंबी येथील श्री शंकर विद्यालयात गौरव सत्यवान वाहुरवाघ(१३), संघर्ष सुभाष चक्रनारायण(१३) हे दोघे सातव्या वर्गात शिकत होते. २८ जून रोजी दोघे शाळेत गेले होते. शाळा सुरू असताना या दोन विद्यार्थ्यांनी शौचास जाण्यासाठी शिक्षकांना परवानगी मागितली. शाळेत शौचालय असतानाही त्यांना बाहेर शौचास जाण्यास सांगितले. शाळेपासून अवघ्या वीस मीटर अंतरावर ग्राम पंचायतमधील ई-क्लास गट क्रमांक ३७२ या जागेवर अवैध उत्खनन करून अंदाजे वीस फूट खोल व पन्नास फूट लांब व वीस फूट रुंद असा मोठा तलाव याठिकाणी खोदण्यात आला. उत्खनन करून तयार केलेल्या तलावात पावसाचे पाणी साचले. या तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोन विद्यार्थ्यांचा बुडून करूण अंत झाला. या प्रकरणात सत्यवान वाहुरवाघ व सुभाष चक्रनारायण रा. दाळंबी यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत शाळेच्या हलगर्जीमुळे या विद्यार्थ्यांचे नाहक बळी गेल्याचा आरोप केला. त्यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी श्री शंकर विद्यालय कोळंबी येथील मुख्याध्यापक रामेश्वर वक्टे, संजय कुकडे, प्रभारी मुख्याध्यापक नंदकिशोर ठाकरे, विश्वास राऊत, कंत्राटदार मोहित देशमुख यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत.  

ग्राम पंचायतने केली होती तक्रार!श्री शंकर विद्यालयाच्या नजीकच करण्यात आलेल्या या अवैध उत्खननाबाबत कोळंबी ग्राम पंचायतने तहसील, पोलीस ठाणे, जिल्हाधिकाºयांकडे तक्रार दिली होती. या तक्रारीकडे अधिकारी वर्गाने दुर्लक्ष केल्याने या दोन विद्यार्थ्यांचा तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेला महसूल विभागही जबाबदार असल्याचा आरोप मृत विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी महसूल विभागावरही गुन्हा दाखल केला आहे.

 महामार्गावर रास्ता रोको आंदोलनदाळंबी येथील दोन शाळकरी विद्यार्थ्यांच्या मृत्युला जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, या मागणीसाठी दाळंबी येथील संतप्त ग्रामस्थांनी भारिप-बमसंच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रतिभा अवचार, गजानन गवई, सामाजिक कार्यकर्ते संजय वानखडे, सुनील वानखडे, अण्णा वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली दीड तास चक्काजाम आंदोलन केले. तेव्हा त्याची दखल घेऊन महसूल उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, पोलीस उपविभागीय अधिकारी कल्पना भराडे यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतरच रास्ता रोको आंदोलन मागे घेतल्यावर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

 

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात