शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

तुषार पुंडकर हत्याकांड : हल्लेखोरांनी पडलेला मोबाइल उचलला; पुंडकर यांच्या मोबाइल कॉलिंगची पडताळणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 11:14 IST

घटनास्थळापासून शहरातील सीसी फुटेज आणल्यानंतरही कुठलाही सुगावा किंवा संशयास्पद ओळख परेड झालेली नाही.

- विजय शिंदे लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : गोळीबार होऊन ९६ तास उलटूनही प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या हत्याकांडाच्या तपासात पोलीस यंत्रणा गुंतली आहे. पोलीस प्रशासनातील मनुष्यबळाने आपला तपास सुरूच ठेवला असता तरी मात्र या हत्याकांडाच्या मास्टर प्लॅनच्या टेक्निकल तपासावर पोलीस भर देत आहेत. तुषार यांच्या मोबाइल कॉलिंगचा डाटानुसार नंबरची पडताळणी करून हत्याकांडासंबंधीचे नेटवर्क शोधण्याचा प्रयत्न करीत असले तरी मात्र अद्याप मारेकऱ्यांचा सुगावा लागला नाही.शहरातील मध्यवर्ती ठिकाणी अत्यंत निर्दयीपणे तुषारच्या शरीरात गोळ्या घालून ज्या घटनास्थळावर हत्या केली, त्या घटनास्थळापासून शहरातील सीसी फुटेज आणल्यानंतरही कुठलाही सुगावा किंवा संशयास्पद ओळख परेड झालेली नाही. पोलिसांनी आपल्या खबऱ्यांमार्फत माहितीचे जाळे विणले आहे; परंतु ठोस माहिती काढत असतानाच पोलिसांनी आता टेक्निकलच्या आधारावर तपासाला प्रारंभ केल्याची माहिती आहे. तुषार यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर घटनास्थळावरील एका रस्त्यावर भरधाव वेगाने मोटारसायकल घेऊन जाणाºयांचा मोबाइल खाली पडल्यानंतर तो उचलण्यात आल्याचे सीसी कॅमेºयात कैद झाले आहे. त्यामुळे मोटारसायकलवर असलेले अनोळखी दोघे जण हल्लेखोर असावेत, असा संशय बळावत आहे. शिवाय तुषार हे दूध डेअरीमधून फोनवर बोलत बाहेर निघून अंधाराकडे गेल्यानंतर हल्लेखोरांनी तुषारवर गोळीबार करत डाव साधला.त्यामुळे हल्लेखोरांच्या मदतीला तुषारच्या हालचालीवर पाळत ठेवत मोबाइलवर माहिती दिल्या गेली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. विविध ठिकाणी संशयास्पद इसमांवर पाळत व शोधकामी पथके तयार करण्यात आली असली तरी मात्र तुषारच्या हत्येचा तपास तांत्रिकदृष्ट्या मोबाइल नेटवर्कवर केंद्रित केला असल्याचे समजते. हत्येच्या दिवशी तुषारच्या मोबाइलवर जवळपास १५० आउटगोइंग - इनकमिंग कॉल झाले असल्याचा अंदाज आहे. या सर्व मोबाइल नंबरची पडताळणी पोलीस करीत असून, संबंधितांचे बयान नोंदवित आहेत. शिवाय घटनास्थळाच्या परिसरात असलेल्या मोबाइल टॉवर अंतर्गत वारंवार कॉलिंग होणारे व संशयास्पद मोबाइल नंबरच्या डाटावरूनसुद्धा छाननी करण्यात येत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटCrime Newsगुन्हेगारी