शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कापशी तलावाचा निधी ‘पीडब्ल्यूडी’कडे वळता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 02:00 IST

अकोला : महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या कापशी  तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी मनपाला प्राप्त निधी सार्वजनिक  बांधकाम विभागाकडे वळता करण्यात आला आहे. यापुढे ‘ पीडब्ल्यूडी’ विभागाकडून कापशी तलाव येथे पर्यटनस्थळासाठी  विकास कामे केली जातील. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील  यांच्या निर्देशानुसार हा निधी वळता करण्यात आल्याची माहिती  आहे. 

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे मनपाला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या कापशी  तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी मनपाला प्राप्त निधी सार्वजनिक  बांधकाम विभागाकडे वळता करण्यात आला आहे. यापुढे ‘ पीडब्ल्यूडी’ विभागाकडून कापशी तलाव येथे पर्यटनस्थळासाठी  विकास कामे केली जातील. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील  यांच्या निर्देशानुसार हा निधी वळता करण्यात आल्याची माहिती  आहे. कधीकाळी संपूर्ण जुने शहराला पाणीपुरवठा करणार्‍या कापशी  तलावाच्या देखरेखीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. या  तलावात होणार्‍या मासेमारीपासून मनपाला अत्यल्प आर्थिक उत् पन्न प्राप्त होते. तलावातील जलसाठय़ाचा पिण्यासाठी वापर होत  नसून, प्रचंड प्रमाणात गाळ साचला आहे. अशावेळी शहरातील  पक्षीप्रेमी व निसर्गप्रेमींच्या भावना लक्षात घेता या ठिकाणी  सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव मनपाने समोर केला असता, दीड वर्षां पूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी तातडीने  पावणे दोन कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून तलावाला आवारभिंत उभारण्यासह विविध कामे  प्रस्तावित आहेत. महापालिकेने तलावाला आवारभिंत व रस्त्याचे रुंदीकरण  केल्यानंतर उर्वरित एक कोटी रुपयांतून सौंदर्यीकरणाची कामे ‘ पीडब्ल्यूडी’कडून पार पडतील. त्यानुषंगाने मनपाकडे जमा  असणारे एक कोटी रुपये ‘पीडब्ल्यूडी’कडे वळती करण्यात  आले आहेत. 

कापशी तलाव येथे पर्यटन स्थळ विकसित करण्याला मन पाकडून विलंब झाल्यामुळेच हा निधी वळता करण्यात आला.  मनपात भाजपाची सत्ता असताना प्रशासनाकडून काम करवून  घेण्याची सत्ताधार्‍यांची जबाबदारी आहे. -अँड. धनश्री अभ्यंकर, गटनेता भारिप-बमसं

टॅग्स :Waterपाणी