शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

ट्रकचालकाची निर्घृण हत्या, क्लीनरविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: December 23, 2015 02:44 IST

किरकोळ वादातून निर्घृण हत्या; आरोपी क्लीनर फरार.

अकोला: किरकोळ वादातून क्लीनरने ट्रक चालकाची निर्घृण हत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. आरोपी क्लीनर फरार झाला असून, याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्ह्यातील राजरूपपूर येथे राहणारा ट्रकचालक विनोदकुमार त्रिभुवनसिंह(५0) आणि त्याचा क्लीनर पवन कृपाशंकर तिवारी (रा. वणी, जि. कोशांबी) हे डाळ घेण्यासाठी अकोल्यातील एमआयडीसी फेज-३ मधील गजानन भाला यांच्या दाल मिलमध्ये सोमवारी सायंकाळी आले होते. त्यांनी दाल मिलसमोर त्यांचा यूपी ७0 सीटी १११६ क्रमांकाचा ट्रक उभा केला. सायंकाळी ६.३0 वाजताच्या सुमारास ट्रकचालक विनोदकुमार व क्लीनर पवन यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने, पवनने ट्रकमधील लोखंडी सळई विनोदकुमारच्या डोक्यात घातली. यात विनोदकुमार गंभीर जखमी झाला. त्यानंतर पवनने तेथून पळ काढला. रात्रीपर्यंत ट्रकचालक जखमी अवस्थेत एमआयडीसी परिसरात फिरत होता. मंगळवारी सकाळी पोलिसांना तो बीके चौकातील पूजा उद्योगच्या प्रवेशद्वाराजवळ जखमी अवस्थेत आढळला. पोलिसांनी त्याला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रक व रक्ताने माखलेल्या जागेची पाहणी केली. यावेळी इन्व्हेस्टिगेशन कारलाही पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी ट्रकमधील लोखंडी सळई जप्त केली. सिव्हिल लाइनचे पोलीस उपनिरीक्षक हर्षल चापले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रकचा क्लीनर पवन तिवारी याच्याविरुद्ध भादंवि कलम ३0२ अन्वये गुन्हा दाखल केला. वेडा समजून केले दुर्लक्ष ट्रकचालक विनोदकुमार हा जखमी अवस्थेत कुंभारी रोडवर फिरत होता. तो अर्धनग्न होता. त्याची दाढी वाढलेली होती. त्याने रस्त्यावरून जाणार्‍या दुचाकीस्वारांना, दाल मिलमधील कर्मचार्‍यांना मदत मागितली; परंतु त्याचा अवतार पाहून, हा कुणीतरी वेडा असावा म्हणून लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले.एका ट्रकचालकाने पाहिला त्यांच्यातील वादमुंबई येथील एका ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रकचालक अब्दुल गणी सुलेमान हासुद्धा त्याचा ट्रक घेऊन तिथेच आला होता. सोमवारी सायंकाळच्या सुमारास विनोदकुमार व पवन तिवारी यांच्यात भांडण सुरू असल्याचे आपण पाहिले, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. किरकोळ वादातूनच पवन तिवारीने विनोदकुमारची हत्या केल्याचेही अब्दुल गणीने पोलिसांना सांगितले.