पातूर : अकोला-पातूर महामार्गावर शिर्ला फाट्याजवळील ट्रक व कारचा अपघात होऊन कारचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. या अपघातात दोन महिला जखमी झाल्या असून, त्यापैकी एक गंभीर आहे.
पातूर येथील रहिवासी प्रमोद पाटील (३८) हे कार क्रमांक (एमएच ३० एफ ३१५६) ने पणज येथून नातेवाईकाच्या अंतिम संस्कारावरून परत येत होते. पातूर-अकोला मार्गावर कार व ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, कारचा चुराडा झाला होता. या अपघातात कार चालक प्रमोद पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील त्यांची पत्नी वर्षा प्रमोद पाटील, शिला बाळू पाटील ह्या गंभीर जखमी झाल्या. पणज येथून घरी परतत असताना प्रमोद पाटील यांनी मुलगी व मुलाला कापशी येथे नातेवाईकांच्या घरीच उतरवले होते. त्यामुळे सुदैवाने चिमुकल्यांचे प्राण बचावले. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (फोटो) मृतकाचा फोटो