शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

उमरा येथे कृ त्रिम पाणीटंचाई: पिण्याच्या पाण्यासाठी आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 01:36 IST

पातूर : पातूर पंचायत समिती अंतर्गत उमरा-रांगरा गट ग्रामपंचायत असून, त्यामध्ये ११ सदस्य आहेत, तसेच त्या गावात चावडीची विहीर, वाढाची विहीर, खिडकीची, चांभारवाड्यातील, बुद्ध विहारातील व स्टँडवरील अशा सहा सार्वजनिक विहिरी आहेत; मात्र एक महिन्यापासून यापैकी एकाही विहिरीस पाण्याचा थेंब नाही.

ठळक मुद्देग्रामपंचायतवर हलगर्जीचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कपातूर : पातूर पंचायत समिती अंतर्गत उमरा-रांगरा गट ग्रामपंचायत असून, त्यामध्ये ११ सदस्य आहेत, तसेच त्या गावात चावडीची विहीर, वाढाची विहीर, खिडकीची, चांभारवाड्यातील, बुद्ध विहारातील व स्टँडवरील अशा सहा सार्वजनिक विहिरी आहेत; मात्र एक महिन्यापासून यापैकी एकाही विहिरीस पाण्याचा थेंब नाही. त्यासंबंधी ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवक यांना विहिरीचे पाणी आटले, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा किंवा विहीर अधिग्रहण करा व ग्रामस्थांना पाणी द्या हे वारंवार तोंडी सांगितले; पण दीड महिना झाला तरी ग्रामपंचायतने पाण्याची व्यवस्था केली नाही. असे तक्रारकर्त्याने तक्रारीत स्पष्ट नमूद केले आहे. म्हणून उमरा येथील ग्रामस्थ अजाबराव वैदुराम गवई यांनी पिण्याच्या पाण्यासाठी १५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.यासंबंधीची तक्रार २८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी, पालकमंत्री व गटविकास अधिकारी यांना दिली आहे. तसेच तक्रारीच्या निवारणासाठी आठ दिवसांचा अवधीसुद्धा दिला होता; मात्र अजूनपर्यंतसुद्धा पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत, हे मात्र खरे आहे. बाळापूर येथील पाणी पुरवठा विभागाने सहा ते सात दिवसांपूर्वी सावरगाव रोडवरील भोंडी तलावाजवळील संजय संपत मुळे यांच्या शेत सर्व्हे नं. ८४/१ मधील विहिरीला भेट देऊन त्या विहिरीची पाहणी केली असता त्या विहिरीला सद्यस्थितीत ३३ फुटांच्यावर मुबलक पाणी साठा आहे; परंतु त्या विहिरीला अधिग्रहण करावे लागते; मात्र ग्रा.पं.च्या हलगर्जीपणाच्या धोरणामुळे त्या विहिरीचा अधिग्रहणाचा प्रस्ताव रखडला आहे. त्यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

पंधरा दिवसांपासून चावडीच्या विहिरीत पाणी सोडणे सुरू आहे.- लक्ष्मीबाई  श्रीकृ ष्ण धानोरे, सरपंच, उमरा.

बाळापूर पाणी पुरवठा विभागाने गावाबाहेरील विहिरीची पाहणी केली असून, तिचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.- एस. एस. उंडाळ, ग्रामसेवक, उमरा.

टॅग्स :WaterपाणीAkola Ruralअकोला ग्रामीण