शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी गोवारी समाजाचे ‘अन्नत्याग’ आंदोलन सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 12:12 IST

जिल्ह्यातील आदिवासी गोवारी समाजाच्यावतीने शनिवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग व देहत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

अकोला : गोवारी जमातीला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाची शासनाने अंमलबजावणी करून गोवारी जातीसाठी तातडीने सवलती लागू करण्यात याव्या, या मागणीसाठी जिल्ह्यातील आदिवासी गोवारी समाजाच्यावतीने शनिवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग व देहत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे.गोवारी जमातीला अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित ठेवता येणार नाही, त्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गत १४ आॅगस्ट २०१८ रोजी दिला. या आदेशाची शासनाने तातडीने अंमलबजावणी करून आदिवासी गोवारी समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्या, या मागणीसाठी जिल्ह्यातील आदिवासी गोवारी समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग व देहत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात आदिवासी गोवारी जमात समन्वय समितीचे जिल्हा समन्वयक विलास नेवारे, सहसमन्वयक राजू भोयर, गजानन सहारे, शंकरराव राऊत, संजय शेंद्रे, जीवन राऊत, चंदन कोहरे, विनोद ठाकरे, सतीश गजबे, गुंफा चचाने, सुशीला चचाने, रत्नकला नेवारे, शीला ठाकरे, आशा राऊत, ललिता ठाकरे यांच्यासह जिल्ह्यातील ११४ आदिवासी गोवारी समाज बांधव सहभागी झाली आहेत. 

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाची राज्य शासनाने तातडीने अंमलबजावणी करून, आदिवासी गोवारी समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्या, यासाठी समाजाच्यावतीने बेमुदत अन्नत्याग व देहत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे.-राजू भोयरसहसमन्वयक, आदिवासी गोवारी जमात, समन्वय समित

टॅग्स :Akolaअकोलाagitationआंदोलन