शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवड; ७ दिवसात ७ लाख ५६ हजार खड्डे तयार करण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 13:53 IST

जिल्ह्यात २३ मे पर्यंत ११ लाख ६६ हजार खड्डे तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून, उरलेल्या ७ दिवसात ७ लाख ५६ हजार खड्डे तयार करण्याचे आव्हान आता संबंधित यंत्रणांपुढे उभे आहे.

ठळक मुद्देअकोला जिल्ह्यात १९ लाख २२ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. सातही तालुक्यात ११ लाख ६६ हजार खड्डे तयार करण्यात आले आहेत. सात दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात ७ लाख ५६ हजार खड्डे तयार करण्याचे आव्हान संबंधित यंत्रणांपुढे आहे.

- संतोष येलकर

अकोला : वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत यावर्षी जिल्ह्यात १९ लाख २२ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्यासाठी मे अखेरपर्यंत खड्डे तयार करायचे आहेत. त्यानुषंगाने अकोला जिल्ह्यात २३ मे पर्यंत ११ लाख ६६ हजार खड्डे तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून, उरलेल्या ७ दिवसात ७ लाख ५६ हजार खड्डे तयार करण्याचे आव्हान आता संबंधित यंत्रणांपुढे उभे आहे. खड्डे तयार करण्यासाठी केवळ सात दिवसांचा कालावधी उरला असून, या कालावधीत खड्डे तयार करण्याचे काम पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.हरित पर्यावरणासाठी शासनामार्फत राज्यात राबविण्यात येत असलेल्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत यावर्षी १ ते ३१ जुलै या कालावधीत राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात १९ लाख २२ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मे अखेरपर्यंत (३१ मे) खड्डे तयार करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. त्यानुषंगाने वृक्ष लागवडीसाठी खड्डे तयार करण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामध्ये विविध संबंधित यंत्रणांमार्फत २३ मे पर्यंत जिल्ह्यातील अकोला, अकोट, बार्शीटाकळी, बाळापूर, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यात ११ लाख ६६ हजार खड्डे तयार करण्यात आले आहेत. खड्डे तयार करण्यासाठी आता केवळ सात दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यानुषंगाने सात दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात ७ लाख ५६ हजार खड्डे तयार करण्याचे आव्हान संबंधित यंत्रणांपुढे उभे असून, सात दिवसांच्या कालावधीत खड्डे तयार करण्याचे काम पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.वृक्ष लागवडीचे विभागनिहाय असे आहे उद्दिष्ट !विभाग                                  उद्दिष्ट (लाखात)वन विभाग                             ५.५०सामाजिक वनीकरण               ५.००ग्राम पंचायत विभाग               ५.९१कृषी विभाग                              ० .७०नगरविकास विभाग                  ०.४३जलसंपदा विभाग                      ०.१२इतर विभाग                               १.५६.........................................................एकूण                                           १९.२२खड्डे तयार करण्याच्या नियोजनावर दृष्टिक्षेप !-एकूण करावयाचे खड्डे              :     १९ .२२ लाख-तयार केलेले खड्डे                  :       ११.६६ लाख-बाकी असलेले खड्डे                 :      ०७.५६ लाख

 

टॅग्स :Akolaअकोलाforestजंगल