कोविड संसर्गाची भीती
कोविड चाचणी न करता रुग्णांवर उपचार होत असल्याने अनेकजण कळत न कळत त्या रुग्णांच्या संपर्कात येतात. केवळ चेस्ट इन्फेक्शन असल्याचे सांगत रुग्णांचे नातेवाईक अनेकांच्या संपर्कात येत असल्याने कोविडचा संसर्ग वाढण्याची धोका आहे.
रुग्णांची आर्थिक लूट
सीटी स्कॅनच्या आधारावर खासगी रुग्णालयात रुग्णांवर चार ते पाच दिवस उपचार चालतो. या कालावधीत कोविड चाचणी वगळल्यास रुग्णाच्या इतर चाचण्या केल्या जातात. विविध चाचण्यांसाठी रुग्णांना पैसे मोजावे लागतात. चार ते पाच दिवसांच्या उपचारानंतर रुग्णांचा कोविड चाचणीसाठी स्वॅब घेण्यात येतो. त्यात रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास त्यांना कोविड रुग्णालयात संदर्भीत केले जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे रुग्णांना पुन्हा उपचाराचा खर्च करावा लागत आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात हा प्रकार सर्रास होत असला, तरी त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, काही खासगी कोविड रुग्णालयात रूग्णांची आर्थिक लुट होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत, मात्र त्यावरही कारवाई होत नसल्याची माहिती आहे.