शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर पोलीस उपनिरीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 12:13 IST

पोलीस उपनिरीक्षक दीपक मारोती सोळंके यास अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी अटक केली.

अकोला : देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यास पकडल्यानंतर दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करून अटक न करता त्यास सोडून देण्यासाठी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणारा त्यावेळी मूर्तिजापूर शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस उपनिरीक्षक दीपक मारोती सोळंके यास अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी अटक केली. सलग दोन दिवसांत एकाच पोलीस ठाण्यातील एक अधिकारी आणि एक कर्मचारी लाचखोरीत अडकल्याने मोठ्या प्रमाणात लाचखोरी सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.मूर्तिजापूर येथील सिरसो परिसरातील रहिवासी एका ४३ वर्षीय तक्रारदारावर दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक न करण्यासाठी त्याचवेळी सोडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक दीपक सोळंके याने १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यासोबतच पकडलेली नवीन दुचाकी जप्त न करता जुनी दुचाकी जप्तीमध्ये दाखविली. या मोबदल्यात एकूण २० हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले; परंतु तक्रारदारावर काही संशय आल्याने लाच रक्कम स्वीकारली नाही; मात्र या प्रकरणाची पडताळणी अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० आॅगस्ट रोजी केली. या पडताळणीत आरोपी पोलीस उपनिरीक्षक दीपक सोळंके हा दोषी आढळल्याने लाचखोर पोलीस उपनिरीक्षकास गुरुवारी रामदासपेठ पोलीस ठाण्यातून अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी केली.दोन दिवसांत दोन ट्रॅपलाचखोर पोलीस अधिकारी व कर्मचाºयावर दोन दिवसांत दोन ट्रॅप झाल्याने मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यातील लाचखोरी प्रचंड वाढल्याचे वास्तव आहे. पहिल्याच दिवशी एका कर्मचाºयास लाच घेताना अटक केल्यानंतर दुसºयाच दिवशी त्याच पोलीस ठाण्यातील एक अधिकारी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करताना पडताळणीत दोषी आढळतो. यावरून लाचखोर पोलिसांनी गेंड्याची कातडी पांघरल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागMurtijapurमुर्तिजापूरPoliceपोलिस