अकोला: जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग-३ व वर्ग-४ मधील कर्मचार्यांच्या बदली प्रक्रियेत गुरुवारी ६५ कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये सामान्य प्रशासन, आरोग्य, महिला व बालकल्याण आणि बांधकाम विभागातील कर्मचार्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागामधील वर्ग -३ आणि वर्ग-४ मधील कर्मचार्यांच्या बदल्या १५ मे २0१४ च्या शासन निर्णयानुसार समुपदेशनाद्वारे करण्याचे निर्देश शासनामार्फत जिल्हा परिषदेला प्राप्त झाले. त्यानुसार जिल्हा परिषदेतील कर्मचार्यांच्या १0 टक्के प्रशासकीय व १0 टक्के विनंतीवरून बदल्या करण्याची प्रक्रिया बुधवार, १३ मे पासून सुरू करण्यात आली. पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेच्या कृषी, पंचायत, पशुसंवर्धन, अर्थ व लघुसिंचन इत्यादी चार विभागातील २८ कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. बदली प्रक्रियेच्या दुसर्या दिवशी गुरुवारी सामान्य प्रशासन , महिला व बालकल्याण, आरोग्य आणि बांधकाम या चार विभागातील ६५ कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. सामान्य प्रशासन विभागातील १0 प्रशासकीय, ३२ विनंतीवरून व एका कर्मचार्याची आपसी बदली करण्यात आली. बांधकाम विभागातील एक प्रशासकीय व दोन कर्मचार्यांच्या विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या. आरोग्य विभागातील १४ कर्मचार्यांच्या विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या.
अकोला जिल्हा परिषदेच्या ६५ कर्मचा-यांच्या बदल्या
By admin | Updated: May 15, 2015 01:38 IST