शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३३८ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 16:38 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने ही यादी जाहीर करण्यात आली.

अकोला : जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या विविध शाखेतील तब्बल ३३८ पोलीस कर्मचाºयांच्या बदल्यांची यादी बुधवारी दुपारी जाहीर करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने ही यादी जाहीर करण्यात आली असून, बदली झालेल्या कर्मचाºयांना त्यांच्या बदलीच्या ठिकाणी तातडीने रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.अकोला जिल्हा पोलीस दलात एका ठिकाणी पाच वर्षांपेक्षा तसेच तीन वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ झालेल्या पोलीस कर्मचाºयांच्या बदल्या करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात अर्ज मागविण्यात आले होते; मात्र त्यानंतर कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बदल्यांची प्रक्रिया थांबविण्यात आली होती. नंतर राज्य शासनाने प्रशासकीय कारणावरून १५ टक्के बदल्या करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील विविध शाखेत कार्यरत असलेल्या तसेच एकाच पोलीस ठाण्यात किंवा एकाच शाखेत पाच वर्ष तसेच तीन वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ झालेल्या पोलीस कर्मचाº­यांच्या बदल्यांची माहिती मागवली होती. यासोबतच प्रशासकीय कारणावरून त्यांच्या बदल्यांचे अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार पंधरा दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करून जिल्ह्यातील विविध शाखेत कार्यरत असलेल्या तब्बल ३३८ पोलीस कर्मचाºयांच्या बदल्यांची यादी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जाहीर केली आहे. त्यानुसार बदली झालेल्या कर्मचाºयांना तातडीने कार्यमुक्त करून बदलीच्या ठिकाणावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्ह्यातील तीनशे पोलीस कर्मचाºयांच्या लवकरच बदल्या होणार असल्याचे वृत्त ‘लोकमत'ने दोन दिवसांपूर्वी प्रकाशित केले होते. त्यानंतर या बदल्यांसाठी पाच पर्याय मागविल्याने अनेकांच्या मसुद्यावर पाणी फेरण्याचेही वृत्त ‘लोकमत'ने दिले होते. या वृत्ताची दखल घेतल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी पोलीस कर्मचाºयांची एकाच ठिकाणी ठाण मांडून पाच वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ झालेल्यांची बदली करून त्यांना इतरत्र हलविले आहे. यावरून पोलीस अधीक्षक श्रीधर यांनी या बदल्या अभ्यासपूर्ण केल्याची चर्चा पोलीस खात्यात सुरू आहे.

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस