शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 14:57 IST

राज्यातील ५५६ अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व पौगंडावस्थेतील मुले-मुलींना या उपक्रमांतर्गत प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यासाठी २ कोटी ३१ लक्ष रुपये खर्चास १० मे रोजी मान्यता देण्यात आली आहे.

अकोला: दारिद्र्य, अज्ञान व अंधश्रद्धेचा समावेश असलेल्या आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासोबतच त्यांना शिस्त व वैयक्तिक आरोग्यासंदर्भात आत्मनिर्भर करण्यासाठी युनिसेफच्या मदतीने राजमाता बाल आरोग्य व पोषण मिशन अंतर्गत जीवन कौशल्य प्रशिक्षण देण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. राज्यातील ५५६ अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व पौगंडावस्थेतील मुले-मुलींना या उपक्रमांतर्गत प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यासाठी २ कोटी ३१ लक्ष रुपये खर्चास १० मे रोजी मान्यता देण्यात आली आहे.आदिवासी समाजाला विकासाच्या व शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून विविध स्वरूपाचे उपक्रम राबवल्या जातात. आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात असंख्य प्रश्न असतात. वाढत्या वयासोबत त्यांच्या मनात निर्माण होणारे प्रश्न, त्यांना दैनंदिन भेडसावणाºया समस्या ज्यामध्ये आरोग्य, स्वत:ची नीगा राखणे, स्वच्छता, सुरक्षितता, वयात येणे व शैक्षणिक जीवन कसे जगावे याबद्दल अनेक संभ्रम राहतात. अशा मुला-मुलींच्या मनातील प्रश्नांना वाट मोकळी करून देण्यासाठी शासनाने युनिसेफच्या मदतीने राजमाता बाल आरोग्य व पोषण मिशन अंतर्गत राज्यातील अनुदानित ५५६ आश्रमशाळेतील प्रत्येकी चार शिक्षक व इयत्ता ७ वी ते १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना जीवन कौशल्य प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.मास्टर ट्रेनर्स देतील प्रशिक्षणयुनिसेफच्या साहाय्याने आश्रमशाळेतील काही शिक्षकांची निवड करून त्यांना राज्यस्तरावर मास्टर ट्रेनर्सना प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर आश्रमशाळेतील प्रत्येकी दोन महिला व दोन पुरुष शिक्षकांना सदर मास्टर ट्रेनर्स प्रशिक्षण देतील. प्रशिक्षित शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाचे धडे दिले जातील.अमरावती विभागात १२५ शाळाअमरावती विभागात अनुदानित १२५ आश्रमशाळा असून, त्यामधील ५०० शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये औरंगाबाद, अकोला, अमरावती, नांदेड, बीड, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा जिल्ह्याचा समावेश आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाTrible Development Schemeआदिवासी विकास योजनाgovernment schemeसरकारी योजनाStudentविद्यार्थी