शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पुलाचे बांधकाम होण्यापूर्वी अकोटपर्यंत रेल्वे सुरू होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 13:55 IST

अकोट येथील पुलाजवळील अकोला वळण मार्गावरील रेल्वे लोहमार्गावर प्रतिबंधक प्रवेशद्वार बसविण्यात आले आहे.

- विजय शिंदे लोकमत न्यूज नेटवर्कअकोट: अकोला-खंडवा रेल्वे लोहमार्गाच्या रुंदीकरणाचे काम अकोट शहरापर्यंत पूर्ण झाले असून शहरात रेल्वे मार्गावर प्रतिबंधक द्वार बसविण्यात आल्याने लवकरच अकोटपर्यंत रेल्वे सुरू होण्याची शक्यता आहे. अकोट शहराच्या पुढे रेल्वे मार्गाचे काम रखडले आहे. त्यामुळे खंडवापर्यंत रेल्वे सुरू होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागण्याचे संकेत आहेत.चार राज्यांना सोयीचा म्हणून अकोला-खंडवा रेल्वे मार्ग असल्याने या लोहमार्गाचे रुंदीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे अकोटपर्यंत रूळ टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. या रेल्वे मार्गावरून रेल्वेची चाचपणी घेण्यात आली. शिवाय अकोट रेल्वे स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तिकीट कार्यालयासह मनुष्यबळ सज्ज करण्यात आले. केवळ अकोट शहरातील अकोला पुलाचे काम अर्धवट आहे. अकोट येथील पुलाजवळील अकोला वळण मार्गावरील रेल्वे लोहमार्गावर प्रतिबंधक प्रवेशद्वार बसविण्यात आले आहे. सिग्नल उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अकोटपर्यंत रेल्वे सुरू होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या अकोट-अकोला रस्त्याचे काम सुरूच आहे. अशा स्थितीत रस्त्याने प्रवास करणे अवघड झाले आहे. त्यामुळे रेल्वे मार्ग सुरू होण्याचे संकेत मिळत असल्याने जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या मार्गवर अकोलावरून पुढे अकोटपर्यंत, नागपूर, पूर्णा आदी रेल्वेगाड्या धावण्याची शक्यता असली तरी दक्षिण-मध्य रेल्वे प्रशासन काय निर्णय घेते, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. रेल्वेचे आर्थिक उत्पन्न व प्रवासी सोयी पाहता लोकप्रतिनिधींनी अकोटपर्यंत लवकर रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

टॅग्स :akotअकोटrailwayरेल्वेAkola-Khandwa Gauge Conversionअकोला-खांडवा गेज रूपांतरण