अकोट : या तालुक्यात ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बाधित राहावी तसेच शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पडावे, या उद्देशाने ग्रामीण पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या गावांमध्ये शनिवारी रूट मार्च काढण्यात आला आहे.
निवडणूक आढावा घेण्यासाठी दररोज गावातील गस्त घालण्यात येत आहे. संवेदनशील असलेल्या गावावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक गावात जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या नेतृत्वात पथसंचलन करण्यात येत आहे. यामध्ये उपनिरीक्षक धर्माजी डाखोरे, उपनिरीक्षक असलम खान, बीट जमादार, कर्मचारी राज्य राखीव दलाची तुकडी, होमगार्ड यांचा सहभाग आहे.