शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील व्यापाऱ्याने  अकोल्यातील व्यापाऱ्याचे ९२० क्विंंटल सोयाबीन परस्पर विकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 18:50 IST

अकोला : धुळे येथील महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनीचा संचालक असलेल्या कुणाल अग्रवाल याने अकोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आशिष एंटरप्राइजेस येथून तब्बल २७ लाख रुपये किमतीचे ९२० क्विंटल सोयाबीन परस्पर विक्री करून आशिष एंटरप्राइजेसची तब्बल २७ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.

ठळक मुद्देअकोल्यातील आाशिष एंटरप्राईजेसची २७ लाख रुपयांनी केली फसवणूकरामदास पेठ पोलिसांनी केला फसवणुकीचा गुन्हा दाखलकुणाल अग्रवालला केली पुण्यातून अटक

अकोला : धुळे येथील महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनीचा संचालक असलेल्या कुणाल अग्रवाल याने अकोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आशिष एंटरप्राइजेस येथून तब्बल २७ लाख रुपये किमतीचे ९२० क्विंटल सोयाबीन परस्पर विक्री करून आशिष एंटरप्राइजेसची तब्बल २७ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी कुणाल अग्रवालविरुद्ध गुन्हा दाखल करून, त्याला गुरुवारी पुण्यातून अटक केली. आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रामअवतार रामवल्लभ लाहोटी यांच्या मालकीचे आशिष एंटरप्राइजेस हे प्रतिष्ठान आहे. या प्रतिष्ठानमधून धुळे येथील महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनीचा संचालक कुणाल अनिल अग्रवाल याने ९२० क्विंटल सोयाबीनची आवश्यकता असल्याचे सांगून लाहोटी यांच्या एंटरप्राइजेसमधून तब्बल चार ट्रक म्हणजेच ९२० क्विंटल सोयाबीनची खरेदी केली. सदर सोयाबीन २७ लाख ७ हजार ५२८ रुपयांचे असून, लाहोटी यांनी अग्रवालला सदर रकमेची मागणी केली. मात्र, कुणाल अग्रवाल याने या सोयाबीनची रक्कम रामअवतार लाहोटी यांना दिली नाही. त्यानंतर ते सोयाबीन दुसºयाच व्यापाºयाला परस्पर विक्री करून, २७ लाख रुपये हडप केले. २७ लाख रुपयांचे सोयाबीन विक्री करून, लाहोटी यांची फसवणूक केल्यानंतर कुणाल अग्रवाल हा धुळ्यातून फरार होऊन त्याने पुण्यात मुक्काम ठोकला. या प्रकरणाची तक्रार लाहोटी यांनी २१ आॅक्टोबर रोजी रामदास पेठ पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आरोपी कुणाल अनिल अग्रवाल याला पुण्यातून अटक केली. त्याला गुरुवारी अकोला येथील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आरोपी कुणाल अनिल अग्रवाल याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रामदास पेठचे ठाणेदार शैलेष सपकाळ यांनी केली.

चार दिवस घेतला शोधधुळ्यातील रहिवासी कुणाल अग्रवाल याने ९२० क्विंटल सोयाबीनची परस्पर विक्री करून फरार झाल्यानंतर पुणे गाठले. पोलिसांनी २१ आॅक्टोबर रोजी गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचा शोध सुरू केला. मात्र, आरोपीचा शोध लागला नाही. गत चार दिवसांपासून आरोपी पुण्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा पुण्यात शोध घेऊन अटक केली.

टॅग्स :Ramdas Peth Police Stationरामदासपेठ पोलीस स्टेशनAkola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समिती