लोकमत न्यूज नेटवर्कहिवरखेड : अकोटवरून हिवरखेडकडे येणार्या ट्रॅक्टरने दुचाकीस धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना १९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडली. आसीमोद्दीन सलीमोद्दीन रा. अकोट असे जखमी युवकाचे नाव आहे.अकोट येथील आसीमोद्दीन हा दुचाकी क्र. एमएच ३0 एआर १६१३ ने हिवर खेडकडे जात होता. दरम्यान, मार्गावरील पी.पी. जिनिंगजवळ समोरून येत असलेल्या ट्रॅक्टर क्र. एमएच २८ ए ६१२९ ने त्याच्या दुचाकीस जबर धडक दिली. यामध्ये आसीमोद्दीन गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने अकोला येथील सवरे पचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी वृत्त लिहीस्तोवर हिवरखेड पोलीस चौकीत गुन्ह्याची नोंद नव्हती. हिवरखेड ते अकोट मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातात वाढ झाली आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 20:12 IST
अकोटवरून हिवरखेडकडे येणार्या ट्रॅक्टरने दुचाकीस धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना १९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडली. आसीमोद्दीन सलीमोद्दीन रा. अकोट असे जखमी युवकाचे नाव आहे.
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; एक गंभीर
ठळक मुद्देअकोटवरून हिवरखेडकडे जात होता ट्रकघटना १९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडली