शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदी बंद ; अकोला जिल्ह्यात ३२ हजारावर शेतकऱ्यांचा जीव टांगणीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 13:33 IST

अकोला : ‘नाफेड’ मार्फत जिल्ह्यातील तूर खरेदी मंगळवारपासून बंद करण्यात आली आहे. तूर खरेदीस अद्याप मुदतवाढ मिळाली नसल्याने, आॅनलाइन नोंदणी केलेल्या ३२ हजार १४६ शेतकऱ्यांच्या तूर खरेदीची प्रक्रिया रखडली आहे.

ठळक मुद्देतूर खरेदीसाठी जिल्ह्यातील ४५ हजार ९५५ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली. नाफेडमार्फत तूर खरेदीची मुदत १५ मे रोजी सायंकाळी संपुष्टात आल्याने, जिल्ह्यात तूर खरेदी बंद करण्यात आली. आॅनलाइन नोंदणी केलेल्या मात्र तूर खरेदी रखडलेल्या जिल्ह्यातील ३२ हजार १४६ शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

अकोला : ‘नाफेड’ मार्फत जिल्ह्यातील तूर खरेदी मंगळवारपासून बंद करण्यात आली आहे. तूर खरेदीस अद्याप मुदतवाढ मिळाली नसल्याने, आॅनलाइन नोंदणी केलेल्या ३२ हजार १४६ शेतकऱ्यांच्या तूर खरेदीची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे तूर खरेदी केव्हा सुरू होणार, या प्रतीक्षेत जिल्ह्यातील शेतकºयांचा जीव टांगणीला लागला आहे.नाफेडमार्फत जिल्ह्यातील अकोला, तेल्हारा, पातूर, अकोट, बार्शीटाकळी, वाडेगाव, पारस व मूर्तिजापूर इत्यादी आठ केंद्रांवर गत २ फेबु्रवारीपासून तूर खरेदी सुरू करण्यात आली होती. तूर खरेदीसाठी जिल्ह्यातील ४५ हजार ९५५ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली; परंतु खरेदी करण्यात आलेली तूर साठविण्यासाठी वखार महामंडळाच्या जिल्ह्यातील गोदामांमध्ये जागा उपलब्ध नसल्याचे सांगून, तूर खरेदी संथगतीने करण्यात आली व वारंवार खरेदी खंडित करण्यात आली. नाफेडमार्फत तूर खरेदीची मुदत १५ मे रोजी सायंकाळी संपुष्टात आल्याने, जिल्ह्यात तूर खरेदी बंद करण्यात आली. आॅनलाइन नोंदणी केलेल्या ४५ हजार ९५५ तूर उत्पादक शेतकऱ्यांपैकी १५ मेपर्यंत केवळ १३ हजार ८०९ शेतकºयांची तूर खरेदी करण्यात आली असून, उर्वरित ३२ हजार १४६ शेतकºयांची तूर खरेदीची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. तूर खरेदी बंद करण्यात आली असून, खरेदीसाठी अद्याप मुदतवाढ मिळाली नाही, तसेच सरकारमार्फत तूर खरेदीसंदर्भात अद्याप कोणताही आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला नाही. त्यामुळे तूर खरेदी केव्हा सुरू होणार, याबाबत आॅनलाइन नोंदणी केलेल्या मात्र तूर खरेदी रखडलेल्या जिल्ह्यातील ३२ हजार १४६ शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.जिल्ह्यातील तूर खरेदीवर एक दृष्टिक्षेप!-आॅनलाइन नोंदणी केलेले शेतकरी : ४५९५५-तूर खरेदी करण्यात आलेले शेतकरी : १३८०९-तूर खरेदीच्या प्रतीक्षेत शेतकरी : ३२१४६-खरेदी करण्यात आलेली तूर : २ लाख ६हजार ३९१ क्विंटल.-बाकी असलेली तूर खरेदी : २ लाख क्विंटल.जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविला मुदतवाढीचा प्रस्ताव !जिल्ह्यात दोन लाख क्विंटल तूर खरेदीची प्रक्रिया बाकी आहे. त्यानुषंगाने तूर खरेदीसाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव बुधवारी शासनाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेयFarmerशेतकरी