शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

शाळा परिसरातील तंबाखु विक्रेते शासनाच्या रडारवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 12:56 IST

तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थांच्या विक्रीस राज्यात बंदी असताना, शाळा व महाविद्यालय परिसरात याची सर्रास विक्री सुरू आहे

अकोला : शाळा परिसरात सुरू असलेल्या बेकायदा तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर शासनाची नजर असून, विक्रेत्यांवर कोटपा कायद्यांतर्गत कारवाईचे आदेश राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मंत्रिमंडळातील एका बैठकीत दिले. अकोल्यातही शाळा, महाविद्यालय परिसरात हा प्रकार सर्रास सुरू आहे; मात्र त्यांच्यावर कुठलीच कार्यवाही झालेली नाही.तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थांच्या विक्रीस राज्यात बंदी असताना, शाळा व महाविद्यालय परिसरात याची सर्रास विक्री सुरू आहे. कोटपा कायद्यांतर्गत काय कारवाई करण्यात आली, यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळांतर्गत राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनात विविध विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत शाळा परिसरात तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर आणि दुकानांवर करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल करण्याबाबत सूचना डॉ. पाटील यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत. या निर्णयामुळे शाळा, कॉलेजच्या आवारात छुप्या मार्गाने सुरू असलेल्या तंबाखु विक्रीला चाप बसणार असला, तरी प्रत्यक्षात मात्र सर्वत्र तंबाखु विक्री होत आहे.अशी आहे राज्यातील स्थितीग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सर्वेक्षणानुसार, राज्यातील २४.४ टक्के नागरिक तंबाखूचे सेवन करत असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ३.८ टक्के नागरिक हे सिगारेट ओढत असल्याचे आढळून आले आहे. १५ ते १७ वयोगटातील तरुणांमध्ये तंबाखुजन्य पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढले आहे.दर महिन्याला द्यावा लागणार कारवाईचा अहवालकोटपा कायद्यांतर्गत शाळा, महाविद्यालय परिसरात तंबाखुजन्य पदार्थ विकण्यास मनाई आहे. अशा विक्रेत्यांवर कोणती कारवाई केली, किती जणांना दंड ठोठावला, याची माहिती दर महिन्याला सादर करावी लागणार आहे. तंबाखुमुक्त शाळा अभियानासाठी प्रत्येक जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. ग्रामीण भागात काही विक्रेत्यांवर कारवाईदेखील करण्यात आली असून, त्यांना कोटपा कायद्याबाबत जनजागृतीही करण्यात आली आहे.- धम्मसेन सिरसाट, जिल्हा समुपदेशक , राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोला