शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अकोट तालुक्यातील शहापूर शिवारात वाघ मृतावस्थेत आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 18:19 IST

शिवपूर (अकोला): अकोट तालुक्यातील शहापूर ते अमोनाच्या दरम्यान एक वाघ ३ मार्च रोजी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.

शिवपूर / परतवाडा(अकोला/अमरावती): अकोट तालुक्यातील शहापूर ते अमोनाच्या दरम्यान एक वाघ ३ मार्च रोजी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या वाघाचा मृतदेह कुजलेला असल्याने तीन ते चार दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.शहापूर ते अमोनाच्या दरम्यान असलेल्या जंगलात काही ग्रामस्थांना रविवारी एक वाघ मृतावस्थेत आढळला. याविषयी ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देउन पंचनामा केला. या वाघाचा मृतदेह कुजलेला असल्याने त्याचा मृत्यू तीन ते चार दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. या वाघाचा मृत्यू कशाने झाला, याविषयी माहिती मिळू शकली नाही.

दरम्यान,  वाघाचा मृत्यू विद्युत शॉकने झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. डॉक्टरांसह श्वान पथक घटनास्थळी बोलावण्यात आले. गस्त वाढविली असून वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. परंतु मृत वाघाचे सर्व अवयव शाबूत असल्याचे निरीक्षण व्याघ्र प्रकल्पासह मेळघाट वन्यजीव विभागाच्या अधिकाºयांनी नोंदविले आहे. यापूर्वी आकोट वनपरिक्षेत्रात बिबट मृतावस्थेत आढळल्याची पुष्टीही त्यांनी यावेळी दिली. (वार्ताहर)

 

वाघ मृतावस्थेत आढळला. घटनास्थळाचा पंचनामा व शवविच्छेदन अहवालानंतरच वाघाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट सांगता येईल. यासंबंधाने तपास सुरू आहे.- विशाल माळी,विभागीय वनाधिकारी, मेळघाट वन्यजीव विभाग, परतवाडा

टॅग्स :akotअकोटAkolaअकोलाMelghatमेळघाटTigerवाघ