शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील आदिवासी जमातींचा वंचित आघाडीसोबत जाण्याचा निर्धार - माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 18:26 IST

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संघटित झालेल्या वंचित आघाडीसोबत जाण्याचा निर्धार अकोल्यासह राज्यभरातील ४५ अन्यायग्रस्त आदिवासी जमातींनी केला असल्याची माहिती आदिवासी कोळी महासंघाचे अध्यक्ष डॉ. दशरथ भांडे यांनी दिली.

अकोला : राज्यातील अनुसूचित जमातीतील आदिवासींना तत्कालीन व सत्ताधारी पक्षाच्या सरकारने आजवर केवळ आश्वासने दिली. या जमातींना आपल्या घटनादत्त अधिकारांपासून वंचित ठेवण्याचा कुटील डाव राज्य सरकार खेळत आहे. ही बाब लक्षात न्याय मिळण्याच्या उद्देशाने भारिप बहुजन आघाडीचे नेते  अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संघटित झालेल्या वंचित आघाडीसोबत जाण्याचा निर्धार अकोल्यासह राज्यभरातील ४५ अन्यायग्रस्त आदिवासी जमातींनी केला असल्याची माहिती आदिवासी कोळी महासंघाचे अध्यक्ष डॉ. दशरथ भांडे यांनी रविवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.कोळी महादेव, हलबा, माना, गोवारी, मन्नेवार, टोकरे कोळी, ढोर कोळी, अशा अनेक आदिवासी जमाती आदिम काळापासून महाराष्ट्रात वास्तव्यास आहेत. अकोला अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल १ कोटी अन्यायग्रस्त आदिवासींची संख्या आहे. त्यातील कोळी महादेव जमातीसह दीड लाख आदिवासी जमातीतील लोक एकट्या अकोला जिल्ह्यात आहे. तसेच वंचित व आदिवासी समाजाचे महाराष्ट्रात ८५ मतदारसंघात प्राबल्य आहे. म्हणजेच ८२ आमदार निवडून देण्याची ताकद या आदिवासींच्या एकगठ्ठा मतांवर आहे अशी माहिती डॉ. भांडे यांनी यावेळी दिली.आजही अकोला जिल्यातील कोळी महादेव सह इतर आदिवासी घटक आपल्या घटनादत्त अधिकारांपासून वंचित आहे. त्यांना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे अनेक हुशार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. तसेच जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे या जमातीतील कर्मचा?्यांच्या नोकº्या धोक्यात आहेत. त्यामुळे हजारो कुटुंब रस्त्यावर येणार आहेत. मात्र सरकारला त्याचे काहीही सोयरसुतक नाही. मराठ्यांना जेवढ्या ताबडतोब आरक्षण दिले तेवढ्यात तत्काळ महाराष्ट्रातील आदिवासींचे प्रश्नही सरकारने सोडवावे अशी मागणीही डॉ. भांडे यांनी केली. अन्यथा येत्या निवडणुकीत राज्यातील ८५ मतदार संघातील आदिवासी व वंचित घटकांनी भाजपाला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार केला असून, त्यासाठी आगामी काळात डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित आघाडीला पूर्ण जोमाने पाठिंबा देणार असल्याचेही डॉ. भांडे यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरDashrath Bhandeदशरथ भांडे