शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
3
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
4
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
5
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
6
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
7
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
8
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
9
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
10
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
11
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
12
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
13
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
14
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
15
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
16
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
17
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
18
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
19
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
20
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त

सराफा बाजारात उभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:27 IST

अकोला : गेल्या दोन दिवसांत सोने आणि चांदीत तेजी आल्याने अकोला सराफा बाजारात उभारी आली आहे. सोन्या-चांदीचे भाव उधारल्याने सराफा बाजारपेठेत गुंतवणूदार आणि खरेदीदारांची गर्दी वाढली आहे. बाजारपेठेत आलेल्या तेजीमुळे सणासुदीत सोन्या-चांदीच्या दागिण्यांना  चांगला उठाव येण्याचे संकेत जाणकारांकडून मिळत आहेत.

ठळक मुद्देसोन्यासह चांदीच्या भावातही आली तेजी

संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गेल्या दोन दिवसांत सोने आणि चांदीत तेजी आल्याने अकोला सराफा बाजारात उभारी आली आहे. सोन्या-चांदीचे भाव उधारल्याने सराफा बाजारपेठेत गुंतवणूदार आणि खरेदीदारांची गर्दी वाढली आहे. बाजारपेठेत आलेल्या तेजीमुळे सणासुदीत सोन्या-चांदीच्या दागिण्यांना  चांगला उठाव येण्याचे संकेत जाणकारांकडून मिळत आहेत.  नोटाबंदी आणि तीन टक्के जीएसटीनंतर सराफा बाजारात मंदी होती; मात्र सणासुदीनिमित्त सराफा बाजारातील चमक वाढली आहे. नवरात्रीपासून ग्राहक मोठय़ा प्रमाणात सराफा बाजाराकडे वळला आहे. त्यामुळे सोन्याचे भाव ३0 हजार ४00 वरून आता थेट ३0 हजार ८00 प्रतितोळ्यावर पोहोचले आहेत. ही तेजी केवळ सोन्यातच नव्हे, तर चांदीतही दिसून येत आहे. चांदी ४0,000 हजार रुपये किलोवर स्थिरावली होती. ती उसळून आता ४0 हजार ५00 किलोच्या घरात पोहोचली आहे. दसरा-दिवाळीच्या तोंडावर आलेल्या तेजीमुळे अकोला सराफा बाजारातील उलाढाल वाढली आहे. दसरा, धनत्रयोदशी, दिवाळी आणि भाऊबीजच्या मुहूर्तांपासून सोन्या-चांदीच्या खरेदीला सुरुवात होते; मात्र यंदा बाजारात नवरात्रीतच तेजी आल्याने दिवाळीची बाजारपेठ चांगली राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

 सणासुदीचा सेल चांगला होईल म्हणून व्यापार्‍यांनी चांदीत गुंतवणूक केली आहे. ग्राहकांकडूनही प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.-सुनील जांगिड,  विश्‍वकर्मा ज्वेलर्स, अकोला.

धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने चांदीच्या दागिन्यांवर मोठी उलाढाल होते. यंदाही अकोला जिल्हय़ातील सराफा व्यापार्‍यांनी मोठी खरेदी केली आहे. बाजारपेठेत खरेदीदारांची गर्दी वाढत आहे.-राजेश ठकार, चांदीचे ठोक व्यापारी, अकोला.

दरवर्षी दसर्‍यापासून बाजारात उठाव येतो. यंदाही तशी स्थिती निर्माण होत आहे. कास्तकारांजवळ आलेला पैसा दिवाळीनिमित्त बाजारपेठेत येतो. त्यामुळे शुद्ध सोन्याचे दागिने, बदाम अंगठी आणि मिनी मंगळसूत्र खरेदीदारांची गर्दी वाढते. सराफा व्यापारी आमच्याकडून दागिने विकत घेतात, त्यानंतर ते ग्राहकास विकतात.-हिरेन वखारिया, डीपी ज्वेलर्स, अकोला.