शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांपासून तहानलेल्यांची नि:स्वार्थ सेवा, महादेव तायडे देताहेत बोअरचे मोफत पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 10:02 IST

आज समाजात माणूसपण उरले नाही, सर्व जग स्वार्थी आहे, अशी ओरड सुरू आहे. कलियुग आहे, असे उत्तर देऊन अनेक जण मोकळे होतात; परंतु आजही समाजात नि:स्वार्थ सेवा करणाऱ्यांची संख्या कमी नाही.

बोरगाव मंजू (अकोला) : आज समाजात माणूसपण उरले नाही, सर्व जग स्वार्थी आहे, अशी ओरड सुरू आहे. कलियुग आहे, असे उत्तर देऊन अनेक जण मोकळे होतात; परंतु आजही समाजात नि:स्वार्थ सेवा करणाऱ्यांची संख्या कमी नाही. पाण्याचा धर्म आता राहिला नसून, व्यवसाय झाला आहे. पाणपोई दिसेनाशी झाली असून, पाणी विक्रीचा व्यवसाय उभारल्याचे चित्र गावोगावी आहे. अशा परिस्थितीत आपल्या बोअरला लागलेल्या मुबलक पाण्याची विक्री न करता ते तहानलेल्या लोकांना मोफत वितरित करण्याचा उपक्रम महादेवराव तायडे राबवित आहेत.

गत पाच ते सात वर्षे झाली, निसर्गाच्या लहरीपणामुळे अपुरा व अवेळी पाऊस पडल्याने भूजल पातळी खोल गेली. त्यामुळे नदी, नाले, विंधन विहिरी आठल्या. शहरातील विविध भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे, तर शासनाने काही भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे. लोकसंख्या लक्षात घेता सदर पाणी पुरवठा अपुरा आहे. तहान भागविण्यासाठी रानोरान भटकंती करावी लागत असतानाच गत तीन वर्षांपासून येथील प्रतिष्ठित व्यावसायिक महादेवराव तायडे हे भीषण पाणी टंचाईच्या काळात माळीपुरा भागासह इतरही भागात आपल्या बोअरवरून नागरिकांना मोफत पाणी वितरित करीत आहेत. गत दोन वर्षांपासून येथील प्रतिष्ठित व्यावसायिक महादेवराव तायडे हे मोफत पाणी वितरण करून सेवा देतात, तर यावर्षीसुद्धा आपल्या बोअरद्वारे नागरिकांना पाणी देत आहेत. त्यांच्या बोअरवर पाणी भरण्यासाठी नागरिकांची गर्दी असते. सोबतच मुक्या जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. (वार्ताहर)