शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात तीन महिलांकडून मुद्देमाल हस्तगत; महिला नांदेड येथील रहिवासी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 23:34 IST

अकोला : गोरक्षण रोडवरील मलकापूर येथून गांधी चौकात ऑटोने येत असलेल्या महिलेकडील सोनसाखळी पळविणार्‍या तीन महिलांना खदान पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या महिला नांदेड येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांसमोर आली आहे.

ठळक मुद्देअनेक ठिकाणी चोरी केल्याची माहिती खदान पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गोरक्षण रोडवरील मलकापूर येथून गांधी चौकात ऑटोने येत असलेल्या महिलेकडील सोनसाखळी पळविणार्‍या तीन महिलांना खदान पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या महिला नांदेड येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांसमोर आली आहे.मलकापूर येथील रहिवासी शीला संभाजी हटकरे ही महिला ३0 नोव्हेंबर रोजी मलकापूर येथून ऑटोने गांधी चौककडे जात होती. यावेळी इन्कम टॅक्स चौकातून तीन महिला याच ऑटोत बसल्या. या तीनही महिलांनी मोठय़ा शिताफीने हटकरे यांच्याकडील ३५ गॅ्रम सोन्याची सोनसाखळी लंपास केली होती. याप्रकरणी खदान पोलिसांनी तपास सुरू केला असताना हटकरे यांनी सांगितलेल्या वर्णनाच्या तीन महिला कौलखेड चौक परिसरात असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी नितीन मगर यांनी खदान पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तीनही महिलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. या महिलांकडून खदानचे ठाणेदार संतोष महल्ले यांनी १0 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या महिला मराठवाड्यातील नांदेड येथील रहिवासी असून, त्यांनी अनेक ठिकाणी चोरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Akola cityअकोला शहरCrimeगुन्हाKhadan Police Stationखदान पोलीस स्टेशनNandedनांदेड