शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विहिरीसाठी तीन हजार शेतकऱ्यांना मिळणार पाच लाख!

By संतोष येलकर | Updated: September 14, 2024 18:57 IST

अनुदानाच्या रकमेत एक लाख रुपयांची वाढ; जिल्ह्यात विहिरींची कामे मंजूर

संतोष येलकर, अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) सिंचन विहिरीच्या बांधकामासाठी अनुदानाच्या रकमेत ५ ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयानुसार एक लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात १२ सप्टेंबरपर्यंत मंजूर सिंचन विहिरींच्या कामांसाठी ३ हजार १३५ लाभार्थी शेतकऱ्यांना आता पाच लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सिंचन सुविधांसाठी शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचा लाभ देण्यात येतो. त्यासाठी निवड करण्यात आलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना सिंचन विहिरीच्या बांधकामासाठी यापूर्वी प्रत्येकी चार लाख रुपयांचे अनुदान देण्यात येत होते.

दरम्यान, बांधकाम विभागाच्या चालू दरसुचीनुसार आणि केंद्र शासनामार्फत १ एप्रिल २०२४ पासून ‘नरेगा ’ अंतर्गत लागू करण्यात आलेले प्रतिदिवस २९७ रुपये मजुरीचे दर विचारात घेता, राज्य शासनाच्या ५ ऑगस्ट रोजीच्या निर्णयानुसार सिंचन विहिरीच्या बांधकामासाठी अनुदानाची रक्कम पाच लाख रुपये करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार १ एप्रिल २०२४ पासून मंजुरी देण्यात आलेल्या; मात्र कामे सुरू न झालेल्या जिल्ह्यातील ३ हजार १३५ सिंचन विहिरींच्या बांधकामासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना आता पाच लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.तालुकानिहाय अशी आहेत सिंचन विहिरींची मंजूर कामे !

तालुका विहिरीअकोला ११२अकोट १३३बाळापूर २८१बार्शिटाकळी १२९९मूर्तिजापूर ४८६पातूर ६०७तेल्हारा २१७ 

टॅग्स :Farmerशेतकरी